राष्ट्रवादीच्या रेखा जरे हत्येप्रकरणाला राजकीय वळण, पुण्यातून एकाला घेतले ताब्यात

राजकीय पाठबळामुळे अनेक वर्ष गुन्ह्यात आरोपी आणि एका गुन्ह्यात फरार असलेल्या डॉ. निलेश शेळके याला अखेर...

राजकीय पाठबळामुळे अनेक वर्ष गुन्ह्यात आरोपी आणि एका गुन्ह्यात फरार असलेल्या डॉ. निलेश शेळके याला अखेर...

  • Share this:
अहमदनगर, 26 डिसेंबर : यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.  या प्रकरणातील या प्रकरणात राजकीय वरदहस्त असलेल्या डॉक्टर निलेश शेळकेला चौकशीसाठी पोलिसांनी पुण्याहून ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. राजकीय वरदहस्तामुळे  अनेक वर्ष गुन्ह्यात आरोपी आणि एका गुन्ह्यात फरार असलेल्या डॉ. निलेश शेळके याला अखेर रेखा जरे हत्याकांडात चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्याकांड करण्यात आली होती. 24 दिवसांपासून हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार आहे. टीव्ही मालिकेतून सुचली आयडिया : तरुणानं केली प्रेयसीच्या मुलाची हत्या हत्याकांडापासून बाळा बोठे फरार असल्याने त्याला मदत करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे, या हत्याकांडातील आरोपीला मदत केली का म्हणून निलेश शेलकेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, डॉक्टर निलेश शेळके बँक फसवणूक प्रकरणांमध्ये गेली अडीच वर्षापासून फरार होता. काय आहे प्रकरण? रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. 'राहुल गांधी कमी पडताय, यूपीएची अवस्था एनजीओ सारखी', शिवसेनेचं टीकास्त्र गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली.  रेखा जरे यांची सुपारी ही अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिल्याचे तपासातून समोर आले आहे. बाळासाहेब बोठे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
Published by:sachin Salve
First published: