अहमदनगर, 29 मार्च : अहमदनगर (Ahmednagar) शहरात गुंडगिरीच्या घडनेत वाढ झाली आहे. अनेक गुंडांना ( goons) पोलिसांनी तडीपार केले असून गुंड शहरात वास्तव्यास आहे. शहरातील एका कापड दुकानात लाठ्या-काठ्या घेऊन गुंडांनी वसुली केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनाचा भीषण चेहरा समोर आला आहे. काही तडीपार गुंडांची गुंडगिरी खुलेआम सुरू असून नगर शहर पोलीस करतात काय असा प्रश्न सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना पडला आहे. अशाच एका तडीपार गुंडांच्या टोळीने खुलेआम एका कापड दुकानात दांडक्यांचीच दहशत करत लूटमार केली.
याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवल्यावर तोफखाना पोलिसांनी तडीपार गुंड विजय राजू पठारे आणि त्याच्या पाच गुंड साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
विजय पठारे आणि त्याचे साथीदार अनेक व्यापारी-दुकानदारांना भरदिवसा दहशत करून लूटमार करत असले तरी संबंधित हद्दीतील तोफखाना पोलीस करतात काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, या घटनेबाबत अधिक माहिती कॅमेऱ्यासमोर देण्यास तोफखाना पोलिसांनी नकार दिला आहे.
देवमाणूसमधील ठरला डॉक्टर सर्वोत्कृष्ट खलनायक; पाहा Zee Awards विजेत्यांची यादी
संबंधित तडीपार गुन्हेगारांची तडीपारी काही दिवसात संपत आहे, मात्र,अशात या गुंडांनी पुन्हा आपली दहशत शहरात सुरू केल्याने व्यापारी-दुकाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे.
या प्रकरणाची अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांमध्ये स्वतः लक्ष घातले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस स्टेशनची DB ची तपास यंत्रणा बरखास्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.