खळबळजनक! घरात घुसून महिला डॉक्टरची निर्घृण हत्या, मुलांवरही केले सुऱ्यानं सपासप वार

खळबळजनक! घरात घुसून महिला डॉक्टरची निर्घृण हत्या, मुलांवरही केले सुऱ्यानं सपासप वार

TV रिचार्ज करण्याच्या बहाण्यानं घरात घुसला, चोरी करण्यासाठी केली महिला डॉक्टरची हत्या.

  • Share this:

आग्रा, 21 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशमध्ये गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे. आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. चाकूने वार करून डॉक्टरची हत्या केली. तसेच 2 मुलांवरही हल्ला करण्यात आला. संपूर्ण प्रकरण कमला नगर परिसरामधील असून महिला डॉक्टर निशाची हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी डॉ. निशा व मुले घरात होती. डॉ. निशा यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, घटनेनंतर पोलिसांनी चकमकीत आरोपी शुभमला अटक केली. पोलिसांनी शुभमकडून बॅगे जप्त केली,यात चोरीचा माल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही रिचार्ज करण्याच्या बहाण्यानं शुभम घरात घुसला. त्यानंतर चोरीच्या इराद्यानं घरात शिरकाव केला, त्यानंतर डॉक्टर निशाची यांची हत्या केली.

वाचा-बेपत्ता पत्नीला शोधता शोधता पोहचला मित्राच्या घरी, दरवाजा उघडताच सापडले 2 मृतदेह

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. चकमकीत पोलिसांनी शुभम नावाच्या तरूणाला अटक केली. शुभमनं डेंटिस्ट निशा यांची हत्या केल्याचे मान्य केले. तसेच चाकूच्या हल्ल्यामुळे त्यांची दोन मुलंही जखमी झाली.

वाचा-कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

आरोपी शुभम रुग्णालयात

आयजी रेंज ए सतीश गणेश यांनी सांगितले की पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली असता शुभम नावाच्या व्यक्तीने महिला डॉक्टरची हत्या केल्याचे समजले. पोलिसांनी शुभमचा शोध सुरू केला तेव्हा शुभम दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी शुभमला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा शुभमने पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात शुभमच्या पायाला गोळी लागली. गोळी लागल्यामुळे शुभमला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 21, 2020, 12:09 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या