आधी गळा घोटला मग चाकूने...डॉक्टर तरुणीच्या हत्येचा खुलासा करणारा VIDEO

आधी गळा घोटला मग चाकूने...डॉक्टर तरुणीच्या हत्येचा खुलासा करणारा VIDEO

योगिता आणि विवेक 7 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते तर विवेकला तिच्यासोबत लग्न करायचं होतं.

  • Share this:

आग्रा, 20 ऑगस्ट : एसएन मेडिकल महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. योगिता गौतम हत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विवेक तिवारीचा व्हिडीओ न्यूज 18 च्या हाती आला आहे. या व्हिडीओमध्ये योगिताची हत्या कशी केली याचा खुलासा तिवारीनं केला आहे. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो असफल झाला.

'मंगळवारी संध्याकाळी आम्ही भेटलो आणि त्यानंतर एकत्र कारमधून गेलो. तशी ती माझ्यावर आधीच नाराज होती मात्र कारमध्ये आमच्यातील वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात मी तिचा गळा आवळला. योगिताचा मृत्यू झाला की नाही याबबत मी अजूनही कन्फर्म नव्हतो.'

' गळा दाबूनही योगितानं प्राण सोडले नाहीत असं मला वाटलं. माझ्या कारमध्ये एक चाकू कायम असतो मी तो चाकू काढून योगिताच्या डोक्यावर जोरात वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कार निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिचा मृतदेह झुडुपात लपवला आणि त्यावर लाकडं ठेवून मी तिथून निघालो असंही आरोपी विवेक तिवारीनं सांगितलं'

हे वाचा-...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL

योगिता आणि विवेक 7 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते तर विवेकला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. योगिताला मात्र त्याच्यासोबत संबंध ठेवण्यात कोणतंही स्वारस्य नव्हतं असा दावाही आरोपीनं केला आहे. यावरून त्यांच्यात कायम वाद होत होते.

योगिताचा भाऊ डॉ. मोहिंदर कुमार गौतम यानेही पोलिसांना विवेक लग्नासाठी दबाव टाकत असल्याची माहिती तिचं अपहरण झाल्यानंतर दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण, हत्या केल्याप्रकरणी विवेक तिवारीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 20, 2020, 11:04 AM IST

ताज्या बातम्या