Home /News /crime /

पत्नीने पाहिली क्राइम पेट्रोल मालिका, पतीच्या हत्येचा कट ऐकून पोलीसही झाले हैराण

पत्नीने पाहिली क्राइम पेट्रोल मालिका, पतीच्या हत्येचा कट ऐकून पोलीसही झाले हैराण

टीव्हीवरील क्राइम पेट्रोल (crime patrol) मालिका बघून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नागपूर, 06 डिसेंबर : गुन्हेगारी घटनांमुळे कायम चर्चेत असलेली देशाची उपराजधानी नागपूर (Nagpur) एका हत्या प्रकरणामुले चांगलीच हादरली आहे. टीव्हीवरील क्राइम पेट्रोल (crime patrol) मालिका बघून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करुन गिट्टीखदान पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी राजश्री राकेश डेकाटे तिचा प्रियकर रजत शामराव सोमकुवर अशी आरोपींची नावं आहेत. आरोपी रजत हा फिटिंगचे काम करतो. गेल्या 6 वर्षांपासून आरोपी राजश्री आणि रजतचे प्रेमसंबंध होते. पण, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध राजश्री हिचे लग्न राजेश डेकाटे यांच्यासोबत झाले होते. त्यांना चार वर्षांचा वैष्णव नावाचा मुलगा आहे. लग्नानंतरही आरोपी महिलेचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यामुळे पतीला  संपवायचा कट तिने रचला. माहेरी कार्यक्रम असल्याचे राजश्रीने पती राकेशला सांगितले व मंगळवारी सकाळी राजश्रीही पती राकेश व मुलासह धापेवडा येथे गेली. दुपारी ती आपल्या प्रियकराला  भेटली व सगळा कट रचला. त्यानंतर रात्री आरोपी महिला तिचा पती आणि मुलगा मोटरसायकवरून येत असताना मुलाला उलटी येत असल्याचे सांगून मोटरसायकल थांबवायला लावली. राजश्री वैष्णवला रस्त्याच्या बाजूला घेऊन गेली. नेमकं त्याचवेळी मोटरसायकलवर रजत  आला त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. त्याने आधी  दिखावा म्हणून राजश्रीला लोखंडी रॉड मारला. आपल्या पत्नीवर हल्ला झाला म्हणून रजत  मदतीसाठी धावून आला असता आरोपी रजतने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले आणि पसार झाला. हल्ल्यानंतर घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. जखमी अवस्थेत राकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि या घटनेची माहीत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास सुरू केला. तपास करत असताना पोलिसांना राजश्रीच्या मोबाईलची पाहणी केली असता मोबाईलमध्ये रजत यांचे छायाचित्र दिसले, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी राजश्रीची मोबाईल फोनवरील कॉल हिस्ट्री तपासली, त्यावरून सगळं प्रकार  समोर आला. पोलिसांनी राजश्रीची उलटतपासणी केली असता सुरुवातील तिने उडवाउडवीची उत्तर दिली. पण, पोलिसांनी बळाचा वापर केला असता तिने हत्येची कबुली दिली. तिच्या माहितीवरून आरोपी रजतला अटक करण्यात आली. दोघांनीही क्राइम पेट्रोल मालिका पाहून हत्येचा कट रचला होता, अशी कबुलीही दिली. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: नागपूर

पुढील बातम्या