मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /वीस वर्षीय तरुणीवर भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला सामूहिक बलात्कार

वीस वर्षीय तरुणीवर भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला सामूहिक बलात्कार

एका 20 वर्षीय तरुणीवर भाजप (BJP) पदाधिकाऱ्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणी विजय त्रिपाठीचं (Vijay Tripathi) नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर भाजप (BJP) पदाधिकाऱ्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. शहडोल जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष कमल प्रताप सिंह म्हणाले, की याप्रकरणी विजय त्रिपाठीचं (Vijay Tripathi) नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. सोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितलं, की तरुणीचं अपहरण करुन तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारु पाजली आणि 18 तसंच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला.

वैश्य यांनी सांगितलं, की या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोर गंभीर अवस्थेत फेकून गेले. यानंतर पीडितेनं रविवारी 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चारही आरोपी  विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.

तर, विजय त्रिपाठीची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर जिल्हा अध्यक्ष म्हणले, की अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपला गरज नाही. अशा गुन्ह्याचा आणि कृत्याचा भाजप तीव्र निषेध करतं. याचमुळे विजय त्रिपाठीला जैतपूर भाजपच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: BJP, Gang Rape