नवी दिल्ली, 5 एप्रिल : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut Property Seize By ED) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राऊत यांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबरोबर 8 भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर ईडीने दिल्लीतील आप आदमी पक्षाचे नेते तसेच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांचे नातेवाईक आणि त्यांच्या कंपन्यांवरदेखील मोठी कारवाई करण्यात आली आहे.
2017मध्ये सीबीआयकडून गुन्हा दाखल -
केंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सांगितले की, त्यांनी दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात जप्त केली आहे. जैन हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि पाणी मंत्री आहेत. 24 ऑगस्ट 2017मध्ये सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबातील लोक आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. यानंतर हे प्रकरण ईडीकडे आले.
या कंपन्यांविरोधात झाली कारवाई -
काय म्हणावं याला! PUBG साठी 12 वर्षांच्या मुलाचा नको तो प्रताप; पोलिसांनाही फुटला घाम
ईडीचे काय म्हणणे?
ईडीच्या तपासात असे आढळून आले की, 2015-16 या कालावधीत सत्येंद्र कुमार जैन हे सार्वजनिक सेवक असताना, त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित असलेल्या कंपन्यांना हवाला मार्गाने कोलकाता स्थित एंट्री ऑपरेटरकडे रोख हस्तांतरणाच्या बदल्यात शेल कंपन्यांकडून 4.81 कोटी रुपयांच्या स्थानिक नोंदी मिळाल्या. तसेच ईडीने नमूद केले की ही रक्कम जमीन खरेदी करण्यासाठी किंवा दिल्ली आणि आसपासच्या शेतजमिनी खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, Delhi, ED, ED (Enforcement directorate)