Home /News /crime /

Shocking! मोबाइलमधील गाणी ऐकत 22 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Shocking! मोबाइलमधील गाणी ऐकत 22 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पैशांअभावी वडिलांनी नकार दिला होता, आणि तो सहन न झाल्याने तरुणीने जीवन संपवलं.

    जालंधर, 13 सप्टेंबर : जालंधरमधील (Jalandhar News) माडल हाऊस येथील एका 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या (22 old girl Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. जेव्हा तरुणीला भाऊ तिला जेवण देण्यासाठी तिच्या खोलीचं दार ठोठावलं, तेव्हा हा धक्कादायक खुलासा (Shocking News) झाला. बराच वेळ बहीण दार उघडत नसल्यामुळे शेवटी घरातील सदस्यांनी खोलीचं दार तोडलं. यावेळी तरुणीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हे ही वाचा-प्रियकरासोबत पळून गेल्याच्या 8 दिवसांत विद्यार्थिनीचा मृत्यू; कुटुंब हादरलं! मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या वडिलांचे पान-बिडीचं छोटंस दुकान आहे. बऱ्याच दिवसांपासून तरुणी तिच्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र पैशांअभावी वडिलांनी जाता येणार नसल्याचं सांगितलं. यामुळे नाराज झालेली तरुणी आपल्या खोलीत गेली आणि दार लावून घेतलं. यानंतर तिने मोबाइलवर गाणी लावली. आणि गाणी ऐकत तिने दुपट्ट्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. (After playing songs in the mobile the young woman committed suicide by strangling the fan) गेल्या अनेक दिवसांपासून देशात आत्महत्याच्या घटनांमध्ये वाढ (Increase in suicide rates) होताना दिसत आहे. कोरोना आणि त्यानंतर लागू केलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. मात्र या मानसिक त्रासाला सामोरे जाताना आपलं मानसिक आरोग्य जपण्याची नितांत गरज आहे. काही अडचणी किंवा समस्या असल्यास मित्र-मैत्रिणी वा नातेवाईकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावनांवर आवर घालणे अत्यंत गरजेचे आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Punjab, Suicide

    पुढील बातम्या