Home /News /crime /

पीयूष जैननंतर आणखी एका व्यावसायिकाच्या घरी छापेमारी; कॅशचा आकडा पाहून बँक कर्मचारी हादरले!

पीयूष जैननंतर आणखी एका व्यावसायिकाच्या घरी छापेमारी; कॅशचा आकडा पाहून बँक कर्मचारी हादरले!

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

यापूर्वी इनकम टॅक्स आणि डीजीजीआयने अत्तर व्यावसायिक पीयूष जैन याच्या कानपूर आणि कन्नोजसह अनेक ठिकाणी छापेमारी केली होती.

    कन्नौज, 1 जानेवारी 2022 : IT Raid Kannauj: कन्नौज येथील अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब याच्या विविध जागांवर सुरू असलेल्या इनकम टॅक्सच्या छापेमारीत कोट्यावधी (Crime News) नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या छापेमारीत मोहम्मद याकूबच्या घरातील काउंटिंग संपली आहे. त्याच्या घरात बँक कर्मचाऱ्यांनी (Bank employees) नोटा मोजण्यासाठी मशीन आणली होती. 4 ते 5 कोटी रुपये केले जप्त बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाच्या ठिकाणाहून तब्बल 4 ते 5 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोनंदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत. अद्यापही इनकम टॅक्सची टीम तपास करीत आहे. बँक डॉक्यूमेंटचा फोटो स्टेटदेखील केला जप्त.. कन्नौजमध्ये मोहम्मद मलिक परफ्यूमर्सच्या घरात आणि फॅक्टरीत सापडलेल्या कागदपत्रांसाठी एक फोटो स्टेट मशीनदेखील मागवण्यात आली. मोहम्मद मलिक हा याकूब मलिक याचा लहान भाऊ आहे. परफ्युम्सचा मुख्य व्यवसाय मोहम्मद मलिक याचे दोन्ही मुलं पाहतात. मोठा मुलगा मुंबईतील व्यवसाय पाहतो आणि लहान मुलगा फैजान कन्नोजमध्ये व्यवसाय पाहता. फैजानची सासरची मंडळीदेखील अत्तर व्यवसायाशी जोडलेली असल्याचं सांगितलं जात आहे. 1886 मध्ये मोहम्मद अयूब आणि मोहम्मद याकूबने स्वत:च्या नावाने फर्म तयार केली होती. हे ही वाचा-थर्टी फस्टच्या रात्री शूटआऊट, घरात घुसून महिलेच्या चेहऱ्यावर झाडली गोळी यापूर्वी समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या घरावर छापेमारी... यापूर्वी इनकम टॅक्स आणि डीजीजीआयने अत्तर व्यावसायिक पीयूष जैन याच्या कानपूर आणि कन्नोजसह अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. कानपूर आणि कन्नोज येथून मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोनं ताब्यात घेण्यात आलं. याची एकून किंमत 200 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पीयूष जैन याच्याजवळून मिळालेली रक्कम आणि सोनं कानपूरमध्ये स्टेट बँकमधील वॉल्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bank, Crime news, Financial fraud

    पुढील बातम्या