पळून लग्न केले पण तरुणीने बदलला जबाब, तरुणाने पहिल्या मजल्यावरून टाकली उडी

पळून लग्न केले पण तरुणीने बदलला जबाब, तरुणाने पहिल्या मजल्यावरून टाकली उडी

तौफिकने दहा दिवसांपूर्वी विशालनगर इथं राहणाऱ्या तरुणीसोबत पळून गेला होता. त्यानंतर दोघांनी धार्मिक पद्धतीने लग्न केले होते.

  • Share this:

औरंगाबाद, 05 नोव्हेंबर :  औरंगाबाद (Aurangabad )शहरातील हुसेन कॉलनी येथील एका तरुणाने दहा दिवसांपूर्वी प्रेयसीसोबत (love marriage) पळून जावून लग्न केले होते. पण, पोलीस स्टेशनमध्ये प्रेयसीने जबाब बदल्यामुळे तरुणाने पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, तौफिक शेख अहमद शेख (वय 21) असं या तरुणाचे नाव आहे. तौफिकने दहा दिवसांपूर्वी विशालनगर इथं राहणाऱ्या तरुणीसोबत पळून गेला होता. त्यानंतर दोघांनी धार्मिक पद्धतीने लग्न केले होते. पण, लग्न झाल्यानंतर दोघेही जण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. लग्न तर केले पण पुढे कुठे जायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. अखेर त्यांनी ओळखीतील लोकांशी चर्चा केली असता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

दोस्त माझा मस्त: मालकाकडे परतण्यासाठी पाळीव कुत्र्याचा 14 दिवसांचा प्रवास

त्यानंतर तौफिक आणि तरुणी बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली. त्यानंतर तरुणी ही विशालनगर भागात  राहणारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वाळूज पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर तौफिक आणि या तरुणीला पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांना देखील बोलवण्यात आले होते. तरुणी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या आई वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

पोलीस स्टेशनमध्ये तौफिक आणि तरुणी पोहोचल्यानंतर आई वडिलांनी आपल्या मुलीची समजूत काढली. दहा दिवसांपासून तौफिकसोबत बाहेर राहिल्यामुळे तरुणी हादरलेली होती. आई-वडिलांनी समजूत काढल्यानंतर तरुणीने आपला विचार बदला आणि तौफिकसोबत जाण्यास नकार दिला.

तरुणीने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे तौफिकला मोठा धक्का बसला. त्याने थेट पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: November 5, 2020, 9:48 AM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या