उत्तर प्रदेश, 12 सप्टेंबर : मेनपुरीमध्ये लग्नानंतर (Marriage) नवरीला घरी घेऊन जाणाऱ्या नवरदेवासोबत मोठी घटना घडली. यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण आता पोलीस गेलं असून याबाबत चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील करहल चौकात राहणाऱ्या तरुणीने कस्बा मार्गावर राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. तरुण लग्न करून नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचला. त्यावेळी तरुणी त्याला फसवून कॅश, ज्वेलरी घेऊन बेपत्ता झाली. या घटनेनंतर पीडितेच्या पतीला मोठा धक्का बसला आहे. (after marriage The bride tricked him and disappeared with cash and jewellery )
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी येथील एक व्यक्ती मुलीचं लग्नाचं स्थळ घेऊन आले होते. पीडित तरुणाचे वडील राजेंद्र यांनी लग्नासाठी परवानगी दिली. मात्र या लग्नात मुलीला 80 हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. दोघांनीही हे मान्य केलं.
हे ही वाचा-Shocking! बँक ऑफ बडोदाच्या महिला ब्रांच मॅनेजरचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
17 ऑगस्ट रोजी झालं लग्न
शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या एका महिलेने ठराविक रक्कम घेतल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी तरुणीसोबत लग्न केलं. राजेंद्रने आपल्या सुनेला सोन्याचे दागिने दिले. सायंकाळी राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजूने पाणी आणण्यासाठी गेला. परत येऊन पाहिलं तर नवरी गायब झाली होती. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर राजूचे वडील राजेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. करहल रोड येथे राहणाऱ्या महिलेने धोका दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Marriage