Home /News /crime /

प्रेमविवाह केल्यानंतर पतीला लागलं भलतंच व्यसन; विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

प्रेमविवाह केल्यानंतर पतीला लागलं भलतंच व्यसन; विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

Suicide in Pune: पुण्यातील एका विवाहित महिलेनं पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (married women commit suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पुणे, 25 एप्रिल : पुण्यातील एका विवाहित महिलेनं पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (married women commit suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीनं घरभाडं, विजबिल आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लपवून ठेवलेल्या पैशाची दारूवर उधळपट्टी केल्यानं पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. घराचं भाडं कसं द्यायचं या काळजीपोटी संतापलेल्या पत्नीनं स्वतःला पेटवून (Set herself on fire) घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित 25 वर्षीय मृत महिलेचं नाव अंकिता कुंदन कांबळे असून ती उंदरी येथील रहिवासी आहे. तर 29 वर्षीय आरोपी पतीचं नाव कुंदन कांबळे असून तोही उंदरी याठिकाणी आपल्या पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा अंकिताने स्वत:ला पेटून घेतल्यानं त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे. याप्रकरणी मृत अंकिताचे वडील व्यंकट जाधव यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. खरंतर कुंदन आणि अंकिता यांचा नोव्हेंबर 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर कुंदनने दारु पिण्यास सुरुवात केली. कालांतराने त्याला दररोजचं दारूचं व्यसन लागलं. त्यामुळे कुंदन आणि मृत अंकिता यांचे वारंवार खटके उडू लागले. पण कुंदनला फारसा फरक पडला नाही. त्याने दारु पिण्यासाठी पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या अंकिताच्या खांद्यावर येऊन पडल्या. घरभाडं, विजबिल आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता भासू लागली. (वाचा-अपहरण करुन कुटुबीयांदेखत तरुणीवर अतिप्रसंग, बुलडाण्यातील धक्कादायक घटना) यामुळे अंकिता काही पैसे बाजूला लपवून ठेवू लागली होती. पण आरोपी पतीचा तिच्या पैशावर सारखा डोळा असायचा. अशातच आरोपी पतीने काल (शनिवारी) पत्नीने लपवून ठेवलेले सर्व पैसे चोरले आणि दारुवर उडवले. घरभाडं आणि विजबिलासाठी ठेवलेले पैसे कुंदनने दारुवर उडवल्याचं समजताचं मृत अंकिताचा संताप अनावर झाला. त्यातच तिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटून घेतलं. त्यानंतर तिला तातडीनं पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Suicide case, Wife

    पुढील बातम्या