Home /News /crime /

'मला घरात घ्या नाहीतर मारून टाकीन', शेवटी नको तेच झाले, पुण्यातील भीषण घटना

'मला घरात घ्या नाहीतर मारून टाकीन', शेवटी नको तेच झाले, पुण्यातील भीषण घटना

आरोपी नारायण मागील एक महिन्यापूर्वी करकम येथून तळेगाव येथे आपल्या आत्याकडे राहण्यास आला होता.

    आनिस शेख, प्रतिनिधी पुणे, 20 ऑक्टोबर :  तळेगाव दाभाडे येथील डाळ आळी येथे राहणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीला आणि  त्यांच्या पत्नीला मारहाण करत पतीचा खून केल्यानंतर मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंबंधी गुन्हा घडल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विजय झवेरी असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नारायण झवेरी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण झवेरी हा मृताच्या नातेवाईक होता.  आरोपी नारायण मागील एक महिन्यापूर्वी करकम येथून तळेगाव येथे आपल्या आत्याकडे राहण्यास आला होता. पहाटे चार च्या दरम्यान नारायणने तळेगाव येथील आपल्या आत्याच्या घराबाहेर आरडाओरडा करत 'मला घरात घ्या अन्यथा तुमच्या दोघांनाही मारून टाकीन' असे धमकावत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भरचौकात 16 वेळा कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, पुण्यातला थरकाप उडवणारा VIDEO घाबरलेल्या झवेरी कुटुंबीयांनी घराचा दरवाजा उघडताच आरोपी नारायणने याने मयत विजय झवेरी यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर  डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. विजय झवेरी यांचा आपल्या हातून खून झाल्यामुळे नारायण जागचा हादरला. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने  घरातील एका चादरीने मृतदेह पूर्णपणे गुंडाळला आणि चादरीला आग लावली. घरातच लोखंडी सोफ्यावर त्याने विजय झवेरीचा मृतदेह पेटवून दिला. त्यानंतर घटनास्थळावरून तो पळून गेला. या  संपूर्ण घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना माहीत पडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत घरात पेटत असलेल्या मृतदेहावरील आग विझवली तसंच तत्काळ आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तयार करत रेल्वे स्टेशन तसंच शहरातील इतर बस स्टॉपवर आरोपीचा शोध सुरू केला. ...तर पालकच घेणार पोटच्या गोळ्याला संपवण्याचा निर्णय; डॉक्टर देणार मृत्यू तळेगाव येथील बस स्टॉप वर पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी नारायण झवेरी याला पोलिसांनी एका तासाच्या आत अटक केली. त्याच्यावर कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: खून, हत्या

    पुढील बातम्या