बापाला डोक्यात गोळ्या घालून संपवलं, 3 दिवसांनी मुलाचाही झाला मृत्यू

बापाला डोक्यात गोळ्या घालून संपवलं, 3 दिवसांनी मुलाचाही झाला मृत्यू

'सतत हसतमुख आसणारा आपला मित्र दिपक याने असे टोकाचे पाऊल कसे काय उचलले'. त्याच्या मृत्यूने मित्रांना देखील धक्का बसला आहे.

  • Share this:

बारामती, 31 मार्च : तालुक्यातील प्रसिद्ध बागायतदार खोमणे यांची कोऱ्हाळे इथे मोठ्या प्रमाणात शेती आहे. शेतातील ऊस कोणाच्या नावे कारखान्याला घालवायचा या कारणावरून दोन दिवसापूर्वी स्वतःच्या मुलाने वडीलांवर रिवॉल्वरमधून गोळी घालून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली होती. या घटनेत जखमी असलेल्या बारामती खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन दिपक धनवंतराव खोमणे (वय 50) यांचा आज मंगळवारी उपचारादरम्यान बारामतीतील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. गेली तीन दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.

कोऱ्हाळे इथे 29 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता ही गंभीर घटना घडली होती. सापिका वस्ती इथे खोमणे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. हा ऊस कोणाच्या नावे घालवायचा या कारणावरून मुलगा दिपक यांने वडील धनवंतराव धोडींबा खोमणे (वय 74) यांच्यावर गोळी झाडून त्यानंतर स्वतःच्या डोक्यातही गोळी मारून घेतली होती. या घटनेत वडील धनवंतराव यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.

हे वाचा - विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाला सलाम, साठवलेले 11 हजार दिले पंतप्रधान मदत निधीला

गंभीर जखमी असलेल्या दिपक खोमणे यांना बारामतीतून पुण्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने पुन्हा बारामतीला आणत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेली दोन दिवस त्यांची मृत्यूशी लढाई सुरु होती. अखेर आज दुपारी 11.55 वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले.

दिपक खोमणे हे सध्या बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक होते. कृषि पदवीधर असलेल्या दिपक यांनी शेतात, शेतीवर विविध प्रयोग केले होते. ऊस कोणाच्या नावे घालवायचा हे तत्कालीन कारण या पिता-पुत्रांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.

हे वाचा - बायकोच्या औषधासाठी 70 वर्षांच्या चाचांनी जे केलं ते वाचून व्हाल हैराण!

दरम्यान याप्रकरणी यापूर्वीच दिपक खोमणे यांच्यावर वडीलांचा खून केल्याचा तसेच स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी उदय हरिभाऊ खोमणे यांनी फिर्याद दाखल केली असुन आता दिपक यांचाही मृत्यू झाल्याने करोडो रूपयांची संपत्ती असुनही जमिनीचा वाद कुटुंब उद्धवस्त करणारा ठरला आहे. त्यामुळे कोऱ्हाळे गावावर पसरली शोककळा आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय धोंडीबा दाजीबा खोमणे यांच्या कुटुंबात घडलेल्या या घटनेने बारामती तालुका हादरला आहे. स्व. धों. दा. खोमणे हे स्वतः कृषिभूषण होते. त्यांचा मुलगा धनवंतराव यांचीही दोन्ही मुले उच्चशिक्षित होती. त्यापैकी दिपक यांनी वादातून वडीलांवर गोळी झाडत स्वतःवरही पिस्तुलातून गोळी झाडून घेतली.

परिणामी पिता-पुत्राला जीवनाला मुकावे लागले. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. "सतत हसतमुख आसणारा आपला मित्र दिपक याने असे टोकाचे पाऊल कसे काय उचलले" त्याच्या मृत्यूने मित्रांना देखील धक्का बसला आहे.

हे वाचा - कोरोना हरला आणि प्रेम जिंकलं, आजारी पतीला 55 दिवसांत लिहली 45 लव्ह लेटर्स

First published: March 31, 2020, 3:08 PM IST
Tags: cirme news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading