मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर चार मित्रांचा सामूहिक बलात्कार; अमानुष कृत्याचा VIDEO केला व्हायरल

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर चार मित्रांचा सामूहिक बलात्कार; अमानुष कृत्याचा VIDEO केला व्हायरल

Gang Rape in Sitamadhi: एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची (Minor Girl Kidnapping) आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे.

Gang Rape in Sitamadhi: एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची (Minor Girl Kidnapping) आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे.

Gang Rape in Sitamadhi: एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची (Minor Girl Kidnapping) आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

सीतामढी, 04 मार्च : गेल्या काही काळापासून देशात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या (Rape Case) घटनांच्या आलेखात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची (Minor Girl Kidnapping) आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बलात्काराचा व्हिडिओ (Obscene Video) तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणाने पीडित परिवाराला जबरदस्त धक्का बसला आहे. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. बिहारमधील सीतामढी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं चार जणांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर या चार जणांनी संबंधित मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडत पीडित मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ आरोपींनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे संबंधित पीडित परिवाराची प्रचंड बदनामी झाली आहे.

याप्रकरानंतर गावातील लोकांनी या आरोपींविरोधात पंचायतही भरवली होती. परंतू आरोपींनी पंचायतीने दिलेल्या निकालाचं पालन केलं नाही. यानंतर पीडितेच्या कुटूंबाने संबंधित घटनेची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर पीडितेस वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. न्यायालयानेही पीडित मुलीचा तिच्यावर झालेल्या अमानुष कृत्याबद्दल जाब नोंदवून घेतला आहे.

हे ही वाचा-वडिलांना टकला म्हणणं मुलीला पडलं महागात, राग अनावर झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

सीतामढीचे एसपी अनिल कुमार यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी पॉक्सो कायद्यांतर्गत होईल. तसेच सोशल मीडियावर या अमानुष कृत्याचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहितीही एसपीनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सीतामढी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला आहे. पीडितेच्या कुटूंबीयांनी सांगितलं की, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यापासून त्यांना सतत धमकावलं जात आहे. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे पीडित कुटुंब सध्या दहशतीत जगत आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Gang Rape