पत्नीच्या मृत्यूनंतर बाप करीत होता स्वत:च्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; 7 व्या महिन्यात झाली प्रसूती आणि...

पत्नीच्या मृत्यूनंतर बाप करीत होता स्वत:च्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; 7 व्या महिन्यात झाली प्रसूती आणि...

सातत्याने हा आपल्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करीत होता, काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं

  • Share this:

फतेहबाद, 22 सप्टेंबर : हरियाणामधील फतेहबादमधून (Fatehabad) एक अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. या जिल्ह्यातील एका 40 वर्षीय पिता आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपर्यंत बलात्कार करीत होता. ज्यानंतर तिला दिवस गेले. काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीने 7 व्या महिन्यात एका मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर काही वेळातच रविवारी रात्री या नवजात बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या तक्रारीनंतर कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी आरोपी पितावर पोस्को अॅक्टअंतर्गत केस दाखल केली होती. सांगितलं जात आहे की उत्तर प्रदेशात राहणारा एक व्यक्ती दोन मुली व एका मुलासह गावात राहतो. त्याच्या पत्नीचं साधारण 3 वर्षांपूर्वी निधन झालं आहे. आरोपी पिता आपल्या 13 वर्षीय मुलीसोबत तब्बल 6 महिन्यांपासून बलात्कार करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणाची सूचना चाइल्ड हेल्प लाइनवर पोहोचल्यानंतर बाल संरक्षण अधिकारी सुरजीत बाजिया यांच्या नेतृत्वात टीम मुलीजवळ पोहोचली. टीमने मुलीकडून घडलेल्या घटनेविषयी विचारलं. 3 वर्षांपूर्वी तिच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तीचे वडील खूप काळापासून तिच्यावर बलात्कार करीत होते. सांगितले जात आहे की, मुलीच्या पोटात तब्बल 7 महिन्यांचा गर्भ होता. यामुळे तिला गर्भपाताची परवानगी मिळाली नाही.

हे ही वाचा-भयंकर! दारुड्या बापानंच आपल्या पोट्याच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीयाला विकलं

पोलिसांनी केला तपास

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात एका 13 वर्षीय मुलीची प्रसुती झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काही वेळातच या मुलीचा मृत्यू झाला. बाल संरक्षण विभागाने या प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती सांगितली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुरजीत बाजिया यांनी सांगितलं की, आमच्याजवळ वडिलांनी स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती आली आहे. यानंतर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलीस सध्या आरोपीविरोधात पुरावे गोळा करीत असून कारवाई करण्याची तयारी करीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: September 22, 2020, 11:15 AM IST
Tags: rape case

ताज्या बातम्या