पतीने आत्महत्येचं केलं FB लाईव्ह, पण पोलिसांना घरात मिळाले 3 मृतदेह

पतीने आत्महत्येचं केलं FB लाईव्ह, पण पोलिसांना घरात मिळाले 3 मृतदेह

शैलेंद्र असं आरोपी पतीचं नाव आहे. शैलेंद्रने 2 वर्षांआधी शेजारी राहणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. पण...!

  • Share this:

अलीगड, 26 जून : पतीने आपल्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केली केली आणि नंतर स्वत:ला गोळ्या घालून संपवल्याची बातमी समोर येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हत्येआधी पतीने फेसबुकवर लाईव्ह केलं होतं. घटना घडताच शेजाऱ्यांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केलं पण त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

शैलेंद्र असं आरोपी पतीचं नाव आहे. शैलेंद्रने 2 वर्षांआधी शेजारी राहणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. पण तेव्हापासून त्यांच्या कुटुंबामध्ये वाद सुरू होता. याच वादातून शैलेंद्रने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:देखील गोळ्या जाडून आत्महत्या केली. या घटनेमध्ये आणखी एक भयंकर प्रकार समोर आलेला आहे.

गोळ्यांचा आवाज ऐकताच शैलेंद्रचा भाऊ धावत खोलीत आला आणि त्याने भावाचा आणि वहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. हा सगळा प्रकार पाहून त्याचा ताबा सुटला आणि त्याने तिथेच पडलेल्या बंदूकीने स्वत:वर गोळ्या झाडल्या. यात शैलेंद्रच्या भावाचीही मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील इतर सदस्य आणि स्थानिकांची गर्दी झाली. या माहितीवर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी भाऊ, आणि पती -पत्नी पिंकी या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले व पोस्टमार्टमसाठी पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा शैलेंद्रने सोशल मीडिया फेसबुकवर लाईव्ह होता. ज्यामध्ये तो "मी आत्महत्या करतोय आणि मी मनापासून करतोय. मी जे काही करतोय ते ठीक आहे कारण मी आहे मी घरातल्यांमुळे अस्वस्थ आहे. आता मी असं आयुष्य जगू शकत नाही." असं तो म्हणत होता.

या सगळ्या पुराव्यांचा आधारे आणि स्थानिकांच्या चौकशीनुसार पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 26, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading