मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रसगुल्ल्याच्या बदल्यात थेट गोळी; भर बाजारात घडलेल्या प्रकाराने स्थानिक भयभीत

रसगुल्ल्याच्या बदल्यात थेट गोळी; भर बाजारात घडलेल्या प्रकाराने स्थानिक भयभीत

बाजारात गोळीचा आवाज एकून लोक सैरावैरा धावू लागले.

बाजारात गोळीचा आवाज एकून लोक सैरावैरा धावू लागले.

बाजारात गोळीचा आवाज एकून लोक सैरावैरा धावू लागले.

पाटना, 24 एप्रिल : बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराम (Sasaram) भागात एका आरोपीने मिठाई विकणाऱ्य़ा दुकानदाराला गोळी मारल्याचा प्रकार समोर आला. दुकानदाराने आरोपी तरुणाकडून रसगुल्ल्याचे पैसे मागितल्यामुळे याने त्याला गोळी घातली.

यानंतर जखमी दुकानदाराला तातडीने जवळील (Sasaram Civil Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना नोखा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुन्ना नावाचा एक तरुण रसगुल्ला खाल्ल्यानंतर पैसे देत नव्हता. जेव्हा दुकानदार मुरारी साहने त्याच्याकडून पैसे मागितले तर तो नाराज झाला आणि गोंधळ घालू लागला. वारंवार पैसे मागत असल्याने तरुणाने मुरारी साह याला गोळी घातली. भरबाजारात गोळीचा आवाज ऐकून गोंधळ उडला. या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला.

हे ही वाचा-पतीच्या मृत्यूच्या 4 महिन्यात पत्नीनेही संपवलं जीवन; नोट वाचून कुटुंबीयही हादरले

घटनेनंतर जमाव एकत्र आला. स्थानिकांनी तातडीने दुकानदाराला जवळील रुग्णालयात नेलं, येथे दुकानदाराची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. देशात गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अनेक भागांमध्ये बंदूक वा कट्टा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांच्याही हातात बंदूक आली आहे. आणि ही चिंतेची बाब आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news