मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रात्रीच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणं पडलं महागात; रील्स बनवणाऱ्या युवकांसोबत काय घडलं?

रात्रीच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणं पडलं महागात; रील्स बनवणाऱ्या युवकांसोबत काय घडलं?

photo credit - twitter

photo credit - twitter

चार युवकांनी रील बनवण्यासाठी कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली आणि स्वतः बॉनेटवर चढून नाचू लागले.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Meerut, India

  मेरठ, 12 जानेवारी : अलीकडे तरुणाईला रील्स बनवण्याचं वेड लागलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केल्या जाणाऱ्या या रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय होण्यासाठी तरुण-तरुणी कुठेही, कधीही रील्स बनवतात. यातून बऱ्याचदा अपघात, गुन्हे घडल्याचे आपण ऐकतो, वाचतो. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. काही तरुणांना रील्स बनवणं भलतंच महागात पडलं आहे.

  या तरुणांनी रात्रीच्या वेळी गाडीत मोठ्या आवाजात गाणी लावली आणि बॉनेटवर डान्स करून ते रील्स बनवू लागले. ही घटना सीसीटीव्हीत टिपली गेली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

  उत्तर प्रदेशातल्या चार युवकांनी एसएसपी निवासस्थानाजवळ रील बनवण्यासाठी कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली आणि स्वतः बॉनेटवर चढून नाचू लागले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत टिपला गेला. दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं. या घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी मेरठ पोलिसांनी चार युवकांना अटक केली असून, त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे.

  सीओ सदर बाजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घटनास्थळावरच्या सीसीटीव्हीचं फुटेज ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधल्या लालकुर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या एसएसपी निवासस्थानाजवळ आयसीआयसीआय बँकेची शाखा हे. हा व्हायरल व्हिडिओ या बँकेजवळचा आहे. बँकेबाहेर मद्यधुंद अवस्थेत असलेले चार तरुण कारच्या बॉनेटवरून चढून गोंधळ घालताना या व्हिडिओत दिसत आहेत. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या घड्याळ्यानुसार रात्रीचे 12 वाजत आहेत. काही वेळात बँकेच्या दिशेने दोन युवक येतात आणि कारवर नाचत असलेल्या युवकांवर नोटांची बरसात करू लागतात. हा प्रकार सुरू असताना दुसरा एक युवक कारमधून बाहेर येऊन जोरात ओरडताना दिसत आहे.

  हेही वाचा - जावयाने सासूला पळवल्याच्या केसमध्ये नवा ट्विस्ट; आधीपासूनच सुरू होतं प्रकरण, म्हणून लेकीसोबत...

  या चार युवकांच्या गैरकृत्याचा व्हिडिओ साउंडसह रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडिओत `बेबी मेरे बड्डे पर तुम क्या दिलवाओगे…` या हरियाणवी गाण्याचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत आहेत. या गाण्यावर कारच्या बॉनेटवर गोंगाट करत युवक आक्षेपार्ह डान्स करताना दिसत आहेत. युवकांचा गोंगाट एकून रस्त्यावरचे कुत्रे भुंकताना दिसत आहेत. युवकांचा हा ड्रामा बराच वेळ सुरू राहिला. त्यानंतर हे युवक आपापल्या गाड्यांमध्ये बसून तिथून निघून गेले. पोलिसांनी या प्रकरणी युवकांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

  First published:

  Tags: Crime news, Social media, Uttar pradesh news