मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Parali Crime: डॉक्टर जावयानं केलेला अपमान लागला जिव्हारी; सासूनं उचललं टोकाचं पाऊल

Parali Crime: डॉक्टर जावयानं केलेला अपमान लागला जिव्हारी; सासूनं उचललं टोकाचं पाऊल

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

Suicide in Parali: डॉक्टर जावई आणि त्यांच्या कुटुंबीयांनी (Doctor son in law and family) केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं सासूनं (insulted mother in law) आत्महत्या केली असल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 18 मे: 3 आठवड्यांपूर्वी परळी शहरातील विद्यानगर येथील एका महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या (Woman suicide) केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या मुलीनं पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. डॉक्टर जावई आणि त्यांच्या कुटुंबीयांनी (Doctor son in law and family) केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं आईनं (insulted mother in law) आत्महत्या केली असल्याचा खळबळजनक दावा मुलीनं केला आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर जावयासह चौघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी, 29 वर्षीय मुलगी नमिता अमोल रकटे हिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, काही वर्षांपूर्वी नमिताचा विवाह पुण्यातील डॉक्टर अमोल रकेट याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांपासूनचं सासरच्या मंडळीनी नमिताला व तिच्या कुटुंबीयांना अपमानजनक वागणूक द्यायला सुरुवात केली. लग्नात नमिता आणि तिच्या  माहेरच्या लोकांनी चुकीची माहिती देवून दिशाभूल केल्याचा आरोप ठेवत सासरच्या लोकांनी नमिताची आई 60 वर्षीय आई सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे यांचा सतत अपमान केला.

शिवाय लग्नात दिलेलं स्त्रीधन तळतळाट लावून दिल्यानं आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे, असा आरोप करत सासरच्या मंडळींनी दोन लाख रुपये रक्कम आणि सोन्याची एक अंगठी देण्याची मागणी केली. एवढंच नव्हे तर, मृत सुशीला, त्यांचे पती आणि मुलगा यांना जावई डॉ. अमोल रकटे यांच्या पाया पडण्यास भाग पाडलं. शिवाय नमितावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला सतत अपमानित केलं. आपल्या मुलीला होणारा त्रास आणि जावयानं केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं सासू सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे यांनी तीन आठवड्यांपूर्वी गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे.

हे ही वाचा-बायफ्रेंडच्या मदतीने अल्पवयीन नातीने चिरला आजीचा गळा, नागपूर हादरलं

याप्रकरणी मुलगी नमितानं परळी शहर पोलीस ठाण्यात नवऱ्यासहित सासरच्या अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनंतर शनिवारी पती डॉक्टर अमोल शरणआप्पा रकटे, सासू जयश्री शरणआप्पा रकटे, सासरा शरणआप्पा विश्वनाथआप्पा रकटे, नणंद श्रूती शरणआप्पा रकटे या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Suicide