मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नववर्षानिमित्ताने मित्रांसोबत दारू पार्टी; रात्री पत्नी खोलीत गेली तर पंख्याला लटकत होता मृतदेह

नववर्षानिमित्ताने मित्रांसोबत दारू पार्टी; रात्री पत्नी खोलीत गेली तर पंख्याला लटकत होता मृतदेह

आज सकाळी या गोष्टीचा धक्कादायक खुलासा झाला.

आज सकाळी या गोष्टीचा धक्कादायक खुलासा झाला.

आज सकाळी या गोष्टीचा धक्कादायक खुलासा झाला.

पाटना, 2 जानेवारी : बेगूसरायच्या विष्णूपूर (Bihar News) भागात नव वर्षानिमित्ताने रात्री उशिरापर्यंत दारू पार्टी सुरू होती, त्यानंतर 34 वर्षीय तरुण प्रभाकर झा याचा संशयास्पद मृत्यू (Crime news) झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. हे पाहून कुटुंबाला धक्काच बसला. तातडीने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप तपास सुरू आहे. (After calling friends on New Years party the wife who went to see at night found the body hanging from the fan)

मृत तरुणाच्या गळ्यावर गडद निशाण पाहायला मिळाले. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याबाबत खुलासा होईल. खोलीच्या गेटजवळच्या कचऱ्याच्या डब्यात दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. मृत व्यक्तीची पत्नी दिव्या कुमारीने पोलिसांना सांगितलं की, नववर्षानिमित्ताने त्याच्या पतीच्या खोलीत आजूबाजूचे तीन ते चार मुलं दारू पिण्यासाठी आले होते. त्याची दारू पार्टी सुरू असल्याने मी दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारच्या खोलीत झोपायला निघून गेले. पहाटे तीन वाजता तिला जाग आली. त्यानंतर ती पतीच्या खोलीत गेली. यावेळी तिचा पती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. हे पाहून पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली.

हे ही वाचा-4 वर्षांची चिमुरडी अन् 5 कुत्रे; Dog attackचा आतापर्यंतचा सर्वात Dangerous Video

तिने पतीला खाली घेतलं आणि त्याला अंथरूणावर झोपवलं. तिने त्याला पाणीदेखील प्यायला लावलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. तिने पोलिसांना याबाबत सूचना दिली.

First published:

Tags: Bihar, Crime, Suicide