इटावा, 28 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराची (Crime Against Women) प्रकरणं कमी होण्याचं नाव घेत नाही. यासंबंधी आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. इटावा (Etawah) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका अल्पवयीन मुलाने, त्या मुलीचा विनयभंग केला होता. त्याला कंटाळून मुलीने एका खोलीत फाशी घेऊन आत्महत्या (Suicide) केली.
गावातील 17 वर्षीय मुलाने केली होती छेडछाड -
पोलिसांना मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलीच्या आईने, तिने छतावर असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं.
याबाबत अधिक माहिती घेताना कुटुंबियांनी सांगितलं की, गावातल्याच एका 17 वर्षीय मुलाने बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या मुलीसोबत छेडछाड केली. या घटनेमुळे तिला अतिशय त्रास झाला होता. याच त्रासात, रागाच्या भरात तिने फाशी घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. योग्य त्या कारवाईस सुरुवात केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.