Home /News /crime /

लग्नाच्या 6 दिवसांनंतर पतीने विचारलं रात्री कोणाशी बोलतेस? मध्यरात्रीच पत्नी गायब

लग्नाच्या 6 दिवसांनंतर पतीने विचारलं रात्री कोणाशी बोलतेस? मध्यरात्रीच पत्नी गायब

या घटनेनंतर पतीला जबर धक्का बसला..

    पाटना, 20 जून : प्रेमावर कोणाचा कंट्रोल राहू शकत नाही, असं म्हणतात. अशीच एक घटना बिहारमधून (Bihar News) समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर नवरदेवाच्या आनंदाला विरजण लागलं. त्याची नवी नवरी लग्नाच्या सहा दिवसात घर सोडून निघून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी या जोडप्याचं लग्न झालं होतं. तो 17 जून रोजी पत्नीसह सासरी पोहोचला. एका दिवसानंतर पत्नीला घेऊन घरी आला. रात्री झोपायला जात असताना त्याने पत्नीला कोणासोबत तरी फोनवर बोलताना पाहिलं. याबाबत विचारलं तर बहिणीसोबत बोलत असल्याचं सांगितलं. मध्यरात्री जेव्हा नवरदेवा जाग आली तर पत्नी अंथरुणावर नव्हती. तिची शोधाशोध सुरू केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. ती प्रियकरासोबत फरार झाल्याचं समोर आल्यानंतर नवरदेवाला धक्काच बसला. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Marriage

    पुढील बातम्या