मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कोणत्याही हत्या प्रकरणात पोलीस प्रक्रिया कशी असते? गुन्हेगार कसा पोहचतो शिक्षेपर्यंत

कोणत्याही हत्या प्रकरणात पोलीस प्रक्रिया कशी असते? गुन्हेगार कसा पोहचतो शिक्षेपर्यंत

श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात नवीन अपडेट

श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात नवीन अपडेट

सध्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने ज्याप्रकारे तिची निर्घृण हत्या केली, त्यामुळे याला क्रूर समजले जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 नोव्हेंबर : श्रद्धा खून प्रकरणातील मारेकरी आफताब पोलिसांच्या कस्टडीत आहे. पोलीस त्याच्याशी सतत बोलून पुरावे गोळा करत आहेत. हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही. बऱ्याचवेळा खून प्रकरणे खूप गुंतागुंतीची असतात. पोलिसांनी पुरेसे पुरावे आणि साक्षीदार गोळा केले नाहीत, तर न्यायालयातील ही प्रकरणे अनेकदा आरोपींच्या बाजूने जातात. त्याची निर्दोष मुक्तता होऊ शकते.

मात्र, आफताबचे प्रकरण वेगळे आहे. त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली ​​आहे. यानंतर त्याने मृतदेहाचे 36 तुकडे केले. पोलिसांनी त्याच्या जबाबावरुन अनेक ठिकाणांहून जंगलातून काही तुकडे जप्त केले आहेत. त्यांना डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. मात्र, हत्येचा मुख्य पुरावा शीर अद्याप सापडलेले नाही.

आफताब खूप चलाख असल्याचंही समजतं. हत्येपासून बचाव करण्यापर्यंतच्या सर्व युक्त्या त्याने टीव्हीवर अनेक काईम कार्यक्रम पाहून शिकून घेतल्या आहेत. त्याने सर्व काही केले असून कोणताही मागमूस सोडला नाही, यावरुन याची प्रचिती येते. आता अशा प्रकरणांमध्ये पोलिसांची कार्यपद्धती कशी असते? पुरावे कसे गोळा करतात?

पहिली पायरी

एफआयआरची नोंदणी- एफआयआर नोंदवल्यानंतर फौजदारी न्यायाची प्रक्रिया सुरू होते. या प्रकरणी श्रद्धाच्या ओळखीच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, ज्याचा पोलीस तपास करत होते. या अनुषंगाने ही माहिती समोर आली आहे. त्यात आफताब पकडला गेला. ती बेपत्ता झाल्यानंतर श्रद्धाच्या बँक खात्यातून पैसे कसे ट्रान्सफर झाले याचे उत्तर तो देऊ शकला नाही. यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. एफआयआर हा एक लिखित दस्तऐवज आहे जो दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर पोलीस तयार करतात.

दुसरी पायरी

तपास सुरू होतो. पोलीस अधिकारी घटनास्थळी व संबंधित ठिकाणी भेट देतात.

घटनास्थळाची तपासणी

साक्षीदार आणि संशयितांची तपासणी

रेकॉर्डिंग स्टेटमेंट

झाडाझडती

मालमत्ता जप्ती

बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करणे

(याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मिळालेले नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले आहेत. बँक खाती, आफताबची खरेदी आणि प्रत्येक घडामोडी तपासून पुरावे गोळा केले जात आहेत)

नोंदींची मदत घेणे आणि नोंदी नोंदवणे आणि नवीन माहिती जसे की केस डायरी, दैनिक डायरी, पोलिस स्टेशन डायरी इ.

अटक करणे किंवा ताब्यात घेणे

(पोलिसांनी आफताबला याआधीच अटक केली आहे. सध्या तो चौकशीसाठी पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी पोलीस त्याला कोठडीत ठेवून चौकशी करतात. जेणेकरून त्याच्याकडून सर्व माहिती कळेल. अशी माहिती ज्यामुळे केस अधिक बळकट होईल.

वाचा - श्रद्धाने 2020 मध्येच आफताबविरोधात तक्रार करूनही कारवाई का झाली नव्हती? तुळींज पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

तिसरी पायरी

तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस स्टेशन प्रभारी या संदर्भात प्रांतीय दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवतात. आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्यास तपास अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालाला आरोपपत्राचे स्वरूप प्राप्त होते. पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यास स्टेशन प्रभारींनी पाठविलेल्या अहवालाला अंतिम अहवाल म्हणतात.

चौथी पायरी

आरोपपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालय या प्रकरणाची दखल घेते. खटल्याची कार्यवाही सुरू होते.

पाचवी पायरी

आरोप निश्चित केले जातात. फिर्यादीने आरोपींवर लावलेला गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करणे अपेक्षित असते. आरोपीला स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी मिळते. तो पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो.

वाचा - PUNE Crime : लव्ह मॅरेज करुनही मन नाही भरलं, दुसरीवर आला जीव, पत्नीसोबत केलं भयानक कांड

सहावी पायरी

या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास न्यायालय आरोपींना शिक्षा देऊ शकते. खुनाच्या प्रकरणांमध्ये, न्यायालय सहसा पुरावे आणि खुनाचे गांभीर्य किंवा स्वरूप लक्षात घेऊन अशी शिक्षा देऊ शकते.

- सश्रम कारावास

- जन्मठेप

-फाशीची शिक्षा

प्रत्येक खुनाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा होते का?

भारतीय दंड संहितेत फक्त 8 गुन्हे आहेत, ज्यात मृत्युदंडाची शिक्षा आहे. अशा 8 गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप किंवा 10 वर्षे कारावासाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. फाशीची शिक्षा केवळ दुर्मिळ प्रकरणांमध्येच दिली जाते. आफताबने ज्या प्रकारे श्रद्धाची हत्या केली आहे, त्यावरुन हे प्रकरण गंभीर समजलं जाऊ शकतं.

First published:

Tags: Crime