पंडीत नेहरुंविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणं भोवलं, बॉलिवूड अभिनेत्री अटक

पंडीत नेहरुंविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणं भोवलं, बॉलिवूड अभिनेत्री अटक

'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमुळे मागील काही दिवसांपासून पायल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

  • Share this:

जयपूर, 15 डिसेंबर: कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला आज (रविवार) सकाळी अहमदाबादमधून अटक करण्यात आली. याबाबत खुद्द पायलने एक ट्वीट केले आहे. दुसरीकडे, राजस्थानातील बूंदी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमुळे मागील काही दिवसांपासून पायल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

बूंदीच्या पोलिस अधीक्षक ममता गुप्ता यांनी सांगितले की, पायल हिला अटक केली असून तिला बूंदी येथे हलवण्यात येणार आहे. पायल हिने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पायलला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पायल हिने अटकेनंतर पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला टॅग करुन ट्विटरवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 'मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ केल्यामुळे मला राजस्थान पोलिसांनी अटक केली. मी सांगितलेली माहिती गूगलवरुन घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करीच झाली आहे', असे पायलने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाली होती पायल रोहतगी?

'मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो मला आत्ताच समजला. जेव्हा महाराज हरी सिंह यांनी शेख अब्दुल्ला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं, तेव्हा त्यांचे वकील पंडित जवाहरलाल नेहरु होते, असं म्हटलं जातं. ही गोष्ट खरी आहे की खोटी? जर खरी असेल, तर जवाहरलाल नेहरु यांचं देशद्रोही वर्तन आता मला समजतं’ असे पायल रोहतगी हिने म्हटले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: December 15, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading