नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : बेकायदेशीर आर्थिक व्यवहार (
Illegal financial dealings) आणि अफरातफर प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री लिना मारिया पॉलला (
Actress Leena Maria Paul) अटक (
Arrest) करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही अटक केली आहे. लिना ही सुकेश चंद्रशेखर याची पत्नी आहे. सुकेश चंद्रशेखर याला यापूर्वीच 200 कोटींच्या अफरातफऱ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणात लिनादेखील सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
हे मूळ प्रकरण आहे निवडणूक चिन्हाबाबतच्या घोटाळ्याचं. AIADMK या पक्षाचं निवडणूक चिन्ह देण्यासाठी आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मलविंदर सिंह आणि शिविंदर सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. याच काळात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरलाही अटक करण्यात आली. सुकेश जेलमध्ये असतानाच त्याने मलविंदर आणि शिविंदर यांच्या बायकांना संपर्क साधून त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी पैसे देण्याची मागणी केली. हे पैसे हॉंगकॉंगच्या एका खात्यात भरायला सांगून त्यानंतर तुमच्या पतीला जामीनावर सोडण्याची सोय करू, असं आश्वासन दिलं. दोघांच्या पत्नीला वेगवेगळा फोन करून वेगवेगळी रक्कम बँकेत भरायला सांगितली.
पार्टी फंड असल्याचा दावा
पार्टी फंड म्हणून हा पैसा आपण घेत असून तो हाँगकाँगमधील बँकेत जमा करण्यासाठी सांगण्यात आला. त्यानंतर जापना सिंग यांनी 3.5 कोटी रुपये, तर शिविंदरच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये उकळले. या प्रकरणात लिनानंदेखील साथ दिल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे वाचा -
बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा, पाहा VIDEO
2397 कोटींचा अपहार
सिंह बंधूंच्या पत्नींनी केलेल्या दाव्यानंतर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. सिंह बंधू ऑक्टोबर 2019 पासून तिहार तुरुंगात असून त्यांच्या सुटकेचं अमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नींनी केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.