वाळू तस्करांविरोधात ठाण्याच्या महिला अधिकाऱ्याची धडक कारवाई, 7 कोटींचा मुद्देमाल जप्त

वाळू तस्करांविरोधात ठाण्याच्या महिला अधिकाऱ्याची धडक कारवाई,  7 कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाण्यातील खाडीमधून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचं धाबं दणाणलं आहे.

  • Share this:

ठाणे, 14 जानेवारी: ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. काही दिवसात महसूल विभागानं कारवाई करून तब्बल 6 कोटी 48 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.  रेतीसाठा जप्त व नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली आहे.

महसूल विभागाची धडक कारवाई

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक,  कळवा रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडी पात्र, टेंभा, तानसा   या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर होतोय.  अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. वाळू तस्करांनी इथं उच्छाद मांडल्याचं तक्रारीतून सांगण्यात आलं आहे.  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, कल्याण,भिवंडी आणि शहापूर तहसिलदारांनी धडक कारवाई  सुरू केली आहे.  वाळू तस्करांविरोधातील मोहीमेतून मोठा वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच वाळू उपशासाठी वापरण्यात येणार साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यता आलं आहे.

किती साहित्य जप्त केलं?

महसूल विभागाच्या कारवाईत 32 सेक्शन पंप व 25 बार्ज गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे.  तर ३३० ब्रास रेतीसाठा  तसेच 50 ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या कारवाईत 6 कोटी 48 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईत 150 अधिकारी, कर्मचारी सहभागी

वाळू तस्करांविरोधातील कारवाईत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटाही सहभागी झाला होता. सहा तालुक्यातील तहसीलदार या कारवाईत सहभागी झाले होते. तर खनिकर अधिकारी मनोज पाटीलही या कारवाईत सहभागी झाले होते. एवढचं नाही तर महसूल विभागाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी कारवाईत होते. वाळू तस्करांकडून प्रतिकार झाल्यास सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. एकून 150 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक कारवाईत सहभागी झाले होते.

ठाणे तहसीलदाराची धडक कारवाई

ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमने मुंब्रा, पारसिक, कळवा,  रेतीबंदर आणि गणेश घाट परिसरात अवैध वाळू तस्करांविरोधा धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 8 सक्शन पंप आणि 8 बार्ज जप्त करून नष्ट करण्यात आले आहे.

भिवंडी तहसीलदाराचा धडक कारवाई

भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या टीमनंही अवैध वाळू उपशाविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत  9 सक्शन पंप व 6 बार्ज जप्त करून  नष्ट करण्यात आले आहे. तसेच ३३० ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे.

कल्याणध्ये धडक करावाई

कल्याण तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या टीमनं सुद्धा अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केली आहे.   उल्हास नदी खाडी पात्रात प्रत्यक्ष उतरून अवैध रेती उपशा विरोधात कारवाई करण्यात आली आहे.  यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडी पात्रातील 11 सक्शनपंप नष्ट करण्यात आले. तर 9 बार्ज जप्त करण्यात आले.  तसेच 21 ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त करण्यात आले.

शहापुरात अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई

शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने टेंभा व तानसा या दोन ठिकाणी नदी पात्रातातील अवैेध वाळू उपशाविरोधात कारवाई केली आहे.  या कारवाईत  ४  सक्शनपंप जप्त करून नष्ट करण्यात आले आहे.

अंबरनाथमध्ये धडक कारवाई

अंबरनाथ तहसिलदार जयराज देशमुख  आणि त्यांच्या पथकानं अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केली आहे. या  कारवाईत 2   सक्शनपंप नष्ट करण्यात आले आहे.  या संपूर्ण कारवाईत  2  बोटी,  2 हायड्रा, 2 पोक्लेन, 3  गॅस कटर मशिन्स, 4 जेसीबी, 1 बाज  जप्त करण्यात आला आहे. अवैध रेती उत्खनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊले उचलली असून सातत्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं आहे.

------------------------------

अन्य बातम्या

निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी मागवली केळी, काय आहे कारण?

शिवरायांशी तुलना करणाऱ्यावरून उदयनराजेंनी भाजपलाही सुनावलं, UNCUT पत्रकार परिषद

VIDEO: भाजप आमदाराची दादागिर कॅमेऱ्यात कैद, शुल्लक कारणावरून शेजाऱ्याला मारलं

First published: January 14, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading