झुंज संपली, बीडमधील अ‍ॅसिड टाकून पेटवून दिलेल्या तरुणीचा मृत्यू

झुंज संपली, बीडमधील अ‍ॅसिड टाकून पेटवून दिलेल्या तरुणीचा मृत्यू

जखमी अवस्थेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Share this:

बीड, 15 नोव्हेंबर : बीडमध्ये (Beed) येळंब घाट परिसरात प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून (acid attack) आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जखमी अवस्थेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.

पतीने पत्नीच्या क्रेडिट कार्डने केला लाखोंचा खर्च; शेवटी पोलीस ठाण्यात रवानगी

दरम्यान, पहाटे 3 वाजेच्या सुमारास  येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने  रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या  घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती.

दुर्दैवी म्हणजे, पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत  तडफडत होती. काही वेळानंतर  रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून  रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. पण, अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के शरीर भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

3 किमीपर्यंत रांगा, चीन नाही हे आहे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, पाहा हे PHOTOS

या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यानी दिली.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 3:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या