बेळगाव, 12 डिसेंबर : बेळगाव (belgaum )जिल्ह्यातील रायबागमध्ये एका महिलेवर भररस्त्यावर अॅसिड हल्ला (acid attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रायबाग इथं शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पीडित महिला ही बाजारपेठेत भाजीपाला विकण्याचे काम करत होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सुद्धा ती भाजी विकण्यासाठी आली होती. त्यावेळी अज्ञात हल्लेखोर तिच्याजवळ आला. त्याने पीडित महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेले अॅसिड ची बाटली महिलेवर ओतले. महिलेवर अॅसिड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.
12 तास उलटले पण कुणीच बॅग नेण्यासाठी आलं नाही, कराड स्थानकावर थरारक घटना VIDEO
अॅसिड हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिला ही अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.
पीडित महिलेला प्राथमिक उपचारानंतर अधिकच्या उपचारासाठी बेळगावला हलवण्यात आले आहे.
नोकरीसाठी 2 गटांमध्ये तुफान मारामारी, एकमेकांवर चाकूनं केला 39 सपासप वार
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार अॅसिड हल्लेखोराचा रायबाग पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे.