मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Mumbai: बुरखा घालून टाकला परफेक्ट दरोडा; पण यामुळे झाला गजाआड, 8 किलो चांदीसह पळवला होता लाखोंचा ऐवज

Mumbai: बुरखा घालून टाकला परफेक्ट दरोडा; पण यामुळे झाला गजाआड, 8 किलो चांदीसह पळवला होता लाखोंचा ऐवज

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Robbery in Mumbai: अलीकडेच मुंबईतील दादर परिसरात एक जबरी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरानं इमारतीतील असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना गुंगारा देत, एका सराफा व्यावसायिकाच्या कार्यालयातून 8 किलो चांदीसह 5 लाखांपेक्षा अधिकची रोकड पळवली होती.

पुढे वाचा ...

दादर, 15 फेब्रुवारी: अलीकडेच मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) परिसरात एक जबरी दरोडा (Robbery) टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरानं इमारतीतील असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना गुंगारा देत, एका सराफा व्यावसायिकाच्या कार्यालयातून 8 किलो चांदीसह 5 लाखांपेक्षा अधिकची रोकड  (Theft 8 kg silver and 5 lakh cash) पळवली होती. भामट्याने डोक्यापासून पायापर्यंत बुरखा परिधान करून ही चोरी केली होती. त्यामुळे आरोपीला शोधून काढणं एक मोठं आव्हान बनलं होतं. पण पोलिसांनी बारकाईने तपास करत आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बळवंत गुप्ता असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला पनवेल परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गुप्ता हा इलेक्ट्रीशिअन असून कोरोना काळात त्याची नोकरी गेली होती. तसेच त्याच्या वडिलांना कर्करोगाचं निदान झालं होतं. अशा स्थितीत त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. आरोपी गुप्ता यानं 29 जानेवारी रोजी दादर परिसरातील नमन मिड टाऊन इमारतीत चोरी केली होती. येथील एका सराफाच्या कार्यालयातून त्याने 8 किलो चांदीसह 5 लाखाहून अधिकची रक्कम चोरली होती.

हेही वाचा-नांदेड: 'ते' गाणं ऐकताच ढासळलं मानसिक संतुलन, तरुणाच्या मनात आला सुसाईडचा विचार

चोरी करण्यापूर्वी दोन दिवस आधी आरोपीनं संपूर्ण इमारतीची रेकी केली होती. त्यानंतर आरोपीनं रात्रीच्या सुमारास बुरखा घालून येत, हा दरोडा टाकला होता. कार्यालयात चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दादर पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी 140 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. यावेळी आरोपी बुरखा परिधान करून जाताना दिसला. पण त्याची ओळख पटवणं अवघड होतं. त्याचा पायातील शूजची केवळ लेस पोलिसांना दिसली होती. जी ट्रेकींगच्या शूजसाठी वापरली जाते.

हेही वाचा-भावासोबत कपडे खरेदीसाठी गेलेल्या बहिणीचा करुण अंत; रस्त्यावर आपटून गेला जीव

त्यानंतर पोलिसांनी बुरखाधारी व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीचं बारकाईने निरीक्षण केलं. चालण्याच्या पद्धतीवरून तपास करत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या अधारे आरोपीला पनवेल येथून अटक केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला सर्व आरोप नाकारले. पण त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास दादर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Robbery Case