Home /News /crime /

मोठेपणी घेतला लहाणपणी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा बदला; एक नव्हे 16 जणांच्या हत्येची दिली कबुली

मोठेपणी घेतला लहाणपणी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा बदला; एक नव्हे 16 जणांच्या हत्येची दिली कबुली

47 वर्षांच्या व्यक्तीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.

    US Man Says He Killed 16 People Not One: अमेरिकेतून (US) एक हैरान करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या 66 वर्षीय वयस्कराच्या हत्येचा आरोप आहे. सोबतच अधिकाऱ्यांचा संशय आहे की, आरोपीला त्याची पत्नी आणि अन्य तीन लोकांच्या हत्येबाबतही माहिती आहे. आरोपीचं नाव सियान लेनन (Sean Lannon) असं असून तो 47 वर्षांचा आहे. मात्र कोर्टात हजर झाल्यावर लेनने जे काही सांगितलं त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कोर्टात उभं राहिल्यावर तो म्हणाला की, त्याने त्याची पहिली पत्नी, न्यू मॅक्सिकोमधील तिघेजण यांची तर हत्या केलीच आहे, असे मिळून 16 जणांचा खून केला आहे. त्याने केलेल्या दाव्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. आरोपीने सुनावणीदरम्यान हा दावा केला आहे. कुटुंबासोबत फोनवर बोलल्यानंतर त्याने कोर्टात कबुली जबाब दिला. लेननला पकडण्यासाठी अनेक राज्यात शोध मोहीम सुरू होती. त्याने न्यूजर्सीमधील पीडित मायकल डबकोवस्की याची गाडी चोरी केली होती. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने 66 वर्षीय मायकल यांच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांना मारहाण केली. 5 मार्च रोजी न्यू मेक्सिकोच्या सर्वात मोठ्या एअरपोर्टवरुन हा गाडी ताब्यात घेण्यात आली होती. या गाडीत 4 मृतदेह सापडले होते. हे ही वाचा-चोरी करण्याचा प्रयत्न आला अंगलट, शेवटी पोलिसांचीच घ्यावी लागली मदत पोलिसांचं काय म्हणणं आहे? गाडीतील मृतदेहांमध्ये 39 वर्षीय जेनिफर, 21 वर्षीय मिलर, 40 वर्षीय जेस्टन माटा आणि 60 वर्षांचे रँडल एपोस्टालन सापडले आहे. सियान लेनन न्यू मेक्सिकोपासून 80 किमी लांब ग्रांट्स येथे राहत होता. तो लोकांना आपल्या घरी बोलवत व तेथेच त्यांची हत्या करीत असल्याचं सांगितलं जात आहे. मायकलला का मारलं? लेननेन याबाबत सांगितलं की, लहाणपणी मायकलने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. आणि याचे काही फोटोही काढले होते. त्यामुळे लेनन ते फोटो घेण्यासाठी मायकलकडे गेला होता. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या