नागपूर हादरलं! आई-वडील कामाला गेल्याचं पाहून नराधमाने 10 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

नागपूर हादरलं! आई-वडील कामाला गेल्याचं पाहून नराधमाने 10 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

Rape in Nagpur: पीडित मुलीचे आई वडिल दोघंही कामाला गेले होते. या संधीचा फायदा घेवून आरोपीने घरात शिरून 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape On minor girl) केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे.

  • Share this:

तुषार कोहळे, नागपूर,  25 मार्च : घराशेजारी राहणाऱ्या एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर 19 वर्षाच्या युवकाने बलात्कार (Rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी पीडित मुलीचे आई वडिल दोघंही कामाला गेले होते. या संधीचा फायदा घेवून आरोपीने घरात शिरून 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. संबंधित घटना नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

19 वर्षीय नराधम आरोपीचं नाव राजदेव टेंगर शाहू असून तो एमआयडीसीत परिसरातचं राहतो. तसेच दिवसभग उनाडग्या करत फिरणाऱ्या आरोपी शाहू विरोधात यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. छोटी मोठी कारवाई करून त्याला सोडून देण्यात आल्याने त्याचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे. त्यामुळे त्याने या 10 वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

आरोपी शाहूच्या घराशेजारी एक गरीब कुटुंब राहतं. पीडित मुलीचे आईवडिल नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामावर गेले होते. तर मोठी बहिण शिवणक्लासला गेली होती. त्यामुळे घरी केवळ 10 वर्षांची मुलगी आणि तिचा छोटा भाऊ होता. या संधीचा फायदा घेत आरोपी शाहू दुपारी 2.30 च्या सुमारास पीडित मुलीच्या घरी आला. त्याने पीडितेच्या छोट्या भावाला खाऊसाठी पैसे दिले आणि 10 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. दरम्यान मोठी बहिण शिवणक्लास आटोपून घरी परतली. तेव्हा संबंधित भयानक प्रकार तिच्या निदर्शनास आला.

हे ही वाचा-सांगलीजवळ कृष्णा नदीत आढळला नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय

त्यानंतर पीडितेची बहिण आरोपीला मारण्यासाठी त्याच्यावर धावून गेली, पण आरोपीने तिला हिसका मारून पळ काढला. सायंकाळी पीडित मुलीचे आई-वडील घरी परतले मोठ्या मुलीने तिच्या लहान बहिणीसोबत घडलेलं दुर्दैवी कृत्य आपल्या आई वडिलांना सांगितला. ही घटना समोर येताच परिसरात तणाव निर्माण झाला. तर अनेकांनी आरोपीला मारण्यासाठी त्याचा शोध घेतला. पण तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 26, 2021, 11:24 PM IST

ताज्या बातम्या