Home /News /crime /

बलात्काराच्या 'या' घटनेमुळे मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला होता राजीनामा, आरोपीला लोणावळ्यातून अटक

बलात्काराच्या 'या' घटनेमुळे मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला होता राजीनामा, आरोपीला लोणावळ्यातून अटक

एका सामूहिक बलात्काराच्या (Gangrape) घटनेनं 1999 मध्ये अक्षरशः सरकार कोसळलं होते. याच घटनेतील मुख्य आरोपीला आता लोणावळ्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली 23 फेब्रुवारी : ओडिसामधील (Odisha) एका आयएफएस (IFS)  अधिकाऱ्याच्या पत्नीवर झालेल्या सामूहिक बलात्कार (Gangrape) प्रकरणी असलेल्या मुख्य आरोपीला महाराष्ट्रातून अटक करण्यात आलं आहे. याच प्रकरणामुळे ओडिसाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता जेबी पटनायक यांनी 1999 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. भुवनेश्वर-कटकचे पोलीस आयुक्त एस सारंगी यांनी सोमवारी सांगितलं, की विवेकानंद बिस्वाल उर्फ बिबन याला महाराष्ट्राच्या लोणावळा येथील आंबी घाटातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं, की बिबन त्याठिकाणी जालंधर स्वैन अशी खोटी ओळख सांगून प्लम्बरचं काम करत होता. अधिकाऱ्यानं सांगितलं, की आरोपीला पकडण्यासाठी तीन महिने आधीच ऑपरेशन सायलेंट  वाईपर सुरू केलं गेलं होतं. याच आधारे आरोपीला पकडण्यात यश आलं. सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर राज्यभरातील लोकांनी नाराजी ओढावून घेतल्यानं माजी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी 3 जण आरोपी आहेत, यातील दोघांना आधीच अटक करुन आरोपी घोषित करण्यात आलं होतं. मात्र, बिबन जवळपास मागील दोन दशकांपासून फरार होता. याप्रकरणातील एक आरोपी प्रदीप साहू उर्फ पाडिया याचा मागील वर्षी रुग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वात आधी 15 जानेवारी 1999 मध्ये पाडियाला अटक करण्यात आली होती. खुर्दा जिल्हा सत्र न्यायाधीशांनी 2002 मध्ये पाडिया आणि टूना मोहंती यांनी आरोपी घोषित केलं होतं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानंही या निर्णयाला सहमती दिली होती. या तिघांनीही 9-10 जानेवारीच्या रात्री संबंधित महिलेची कार थांबवली होती आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. महिला आपल्या एका पत्रकार मित्रासोबत कटकला चालली होती. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला गेला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape

    पुढील बातम्या