मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अमरावतीत रिकामटेकड्या तरुणांचं विकृत कृत्य; अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करण्यास पाडलं भाग अन्...

अमरावतीत रिकामटेकड्या तरुणांचं विकृत कृत्य; अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करण्यास पाडलं भाग अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Amravati: अमरावतीतील तीन जणांनी गावातील दोन अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करायला भाग पाडून, त्यांचे अश्लील व्हिडीओ (Minor boy's obscene videos) सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

अमरावती, 14 फेब्रुवारी: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तीन जणांनी गावातील अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करायला भाग पाडून, त्यांचे अश्लील व्हिडीओ (Minor boy's obscene videos) सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलांच्या पालकांनी तिवसा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलं आपल्या घराच्या आसपास खेळत होती. यावेळी विकृत मानसिकतेचे तिन्ही तरुण याठिकाणी आले. त्यांनी व्हिडीओ बनवण्याची बतावणी करत अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडलं. तसेच त्यांनी संबंधित घटनेचं चित्रण आपल्या मोबाइलमध्ये केलं. विकृत आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अनेकांना पाठवले आहेत.

हेही  वाचा-'प्रत्येक स्पर्श वाईट नसतो', विनयभंगाच्या गुन्ह्यात न्यायालयाचा मोठा निर्णय

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलांच्या पालकांनी देखील हा व्हिडीओ पाहिला. आपला मुलगा अन्य एका अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य असल्याच पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्यांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच 12 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा कुटुंबीयांनी तिवसा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे.

हेही  वाचा-मतिमंद तरुणीसोबत नराधमाने गाठला विकृतीचा कळस, 5 महिन्यांपासून देत होता नरक यातना

संबंधित प्रकार 'चाईल्ड पोर्नोग्राफी' प्रकरणात मोडत असल्याने पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित तिन्ही आरोपी हे 19, 20 आणि 22 वर्षांचे आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Amravati, Crime news