अजित मांढरे (प्रतिनिधी) ठाणे,12 ऑक्टोबर: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत शुक्रवारी एका डॉक्टर तरुणीला खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला. तर 24 तासाच्या आत ठाण्याच्याच घोडंबदर रोडवर मायलेकींचा अवजड वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे ठाण्यातले रस्ते मृत्यूचा सापळा बनू लागले आहेत असंच म्हणायला हवं.