पठ्ठ्यानं लॉकडाउनमध्येही शोधली लाचखोरीची संधी, शिक्षण विभागातील क्लार्कला रंगेहाथ पकडलं

क्लार्कनं 5 लाख रुपयांची मागणी केली होती मात्र 4 लाख रुपयांवर तडजोड केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडलं.

क्लार्कनं 5 लाख रुपयांची मागणी केली होती मात्र 4 लाख रुपयांवर तडजोड केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडलं.

  • Share this:
    दुमका, 08 एप्रिल : देशात कोरोनाला रोखण्यासाठी 21 दिवसांचं लॉकडाउन करण्यात आलं आहे. यात लॉकडाउनच्या काळातही एका सरकारी बाबूने खाबूगिरीची संधी सोडली नाही. झारखंडमधील दुमका इथं जिल्हा शिक्षण पदाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं आहे. एका शाळेवर होणारी कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना संबंधित क्लार्कला पडकण्यात आलं. जिल्हा शिक्षण पदाधिकाऱ्यांकडून खाजगी शाळेबाबत आलेल्या तक्रारीवर उत्तर मागण्यात आलं होतं. तसंच या नोटिसीसोबत पुढचा आदेश मिळेपर्यंत शाळा उघडू नये असे आदेशही  देण्यात आले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाळा बंदीचे आदेश मागे घेण्यासाठी आरोपी लिपिक इफ्तिकार याने संचालकांकडून 5 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 4 लाख रुपयांवर त्यांचे बोलणे ठरले. शाळेच्या संचालकांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. याबाबत पोलिसांकडून चौकशी केल्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळलं. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या संचालकांना पैसे देण्यास पाठवून सापळा रचला आणि लिपिकाला रंगेहाथ पकडलं. याबाबतचं वृत्त न्यूज 18 हिंदीने दिलं आहे. तक्रार करणाऱ्या अजय कुमार दुबे यांनी सांगितलं की, दुमकामधील शिवपहाड इथं वेस्टर्न इंग्लिश स्कूल चालवतात. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याचं उल्लंघन करत शाळा एक दिवस सुरू ठेवली होती. यावरून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. याला उत्तरही शाळा प्रशासनाने दिलं होतं. हे वाचा : केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क शाळेनं दिलेल्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करत पुढचा आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवा असं सांगण्यात आलं. तसंच शाळेच्या नामांकनावरही बंदी घातली. याबाबत जेव्हा लिपिकाशी संपर्क साधला तेव्हा पैशांची मागणी करण्यात आली. सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर तडतजोड करत 4 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं अशी माहिती तक्रारकर्ते अजय कुमार दुबे यांनी दिली. हे वाचा : 'लॉकडाऊन वाढवावाच लागेल', सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत संपादन - सुरज यादव
    First published: