मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ, पोलिसांकडून एका महिलेला अटक

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ, पोलिसांकडून एका महिलेला अटक

पोलिसांनी हे अकाऊंट कुणाचे आहे, याचा लगेच तपास लावला.

पोलिसांनी हे अकाऊंट कुणाचे आहे, याचा लगेच तपास लावला.

पोलिसांनी हे अकाऊंट कुणाचे आहे, याचा लगेच तपास लावला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 सप्टेंबर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने केली. ही महिला ठाण्यातील रहिवासी आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ठाण्यातील रहिवासी असलेल्या या महिलेने आपली ओळख लपवत फेक अकाऊंट बनवत पोस्ट केली होती. मात्र, पोलिसांनी हे अकाऊंट कुणाचे आहे, याचा लगेच तपास लावला. आणि त्याविरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत या महिलेला अटक केली. पोलिसांनी या महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने फेसबूकवर बनावट नावाने प्रोफाईल बनवले होते आणि 7 सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टवर शिवीगाळ करत एकामागून एक 4 कमेंट केल्या होत्या. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविच्या कलम धारा 419, 468, 469, 504, 505 (1)(c), आणि 509 व्यतिरिक्त आयटी कायद्यानुसार कलम 67, 66(D) अन्वये गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला होता.

हेही वाचा - 'स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी...', दोन कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे भडकले

पोलिसांच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, ज्या आयपी अॅड्रेसवरून ही कमेंट करण्यात आली आहे तो एका महिलेने वापरला आहे. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केले होते. पोलिसांनी पुन्हा तेथे पोहोचून त्याला अटक केली. पोलिसांनी या महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published:

Tags: Amruta fadnavis, Crime news, Facebook