मुंबई, 21 मार्च : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या महाराष्ट्रीयन तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली होती. या प्रकरणी श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याला अटक केलेली आहे. पॉलीग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये त्यानं श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. सध्या हे प्रकरण दिल्लीतील कोर्टासमोर आहे. सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षानं श्रद्धा वालकरची एक ऑडिओ क्लिप कोर्टाला ऐकवली आहे. सरकारच्या वतीनं हजर झालेले विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी सोमवारी दिल्ली न्यायालयासमोर श्रद्धाच्या आवाजातील ऑडिओ क्लिप प्ले केली. या क्लिपच्या माध्यमातून प्रसाद यांनी असा युक्तिवाद केला आहे की, श्रद्धा आणि आफताबची लिव्ह-इन रिलेशनशीप हिंसक वळणावर होती. 'हिंदुस्थान टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी युक्तिवादादरम्यान, प्रॅक्टो अॅपवरून मिळालेली श्रद्धाची ऑडिओ क्लिप प्ले केली. प्रॅक्टो अॅपच्या माध्यमातून श्रद्धा आणि आफताबनं सायकॉलॉजिस्टकडे सेशनसाठी अपॉईंटमेंट घेतली होती. पीटीआयनं प्रसिद्ध केलेल्या तपशीलांनुसार, या क्लिपमध्ये, श्रद्धा म्हणत आहे की, "...जेव्हा मी माझ्या रागाबद्दल बोलू लागते. तेव्हा जर तो आजूबाजूला कुठेही असेल, अगदी वसईमध्ये (मुंबईजवळ), या शहरात माझ्या आजूबाजूला कुठेही असेल तर तो मला शोधेल आणि मला मारण्याचा प्रयत्न करेल, हीच खरी…अडचण आहे. मलाच माहिती नाही त्यानं कितीदा मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने ज्याप्रकारे माझी मान पकडली होती माझा श्वास गुदमरला होता. 30 सेकंद मला श्वासच घेता आला नाही. सुदैवानं मी त्याचे केस ओढून माझा बचाव करू शकले."
आईची हत्या केली नाही, मग तुकडे का केले? न्यायालयाच्या प्रश्नावर रिंपलने केला खुलासा
विशेष सरकारी वकिलांनी श्रद्धानं 23 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातील स्थानिक पोलिसांना लिहिलेल्या पत्राचादेखील आधार घेतला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, "आफताबनं मला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला आहे. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला मारेल, माझे तुकडे करा आणि फेकून देईल."
आरोपपत्रानुसार, आफताब पूनावालानं 18 मे 2022 रोजी लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी जवळजवळ तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्यानं हे अवशेष दिल्लीत ठिकठिकाणी फेकून दिले.
सोमवारी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी लवकर न्याय मिळावा म्हणून या खून खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, "आम्ही फास्ट-ट्रॅक कोर्टात ही कार्यवाही वेळेत चालवण्याची विनंती करतो." त्यांच्या वकील सीमा कुशवाह यांनी सांगितलं की, या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात कालबद्ध कार्यवाही व्हावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.
आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य, अंगावर काटा आणणारी घटना
या प्रकरणातील तक्रारदार विकास वालकर यांनी सांगितलं की, श्रद्धाच्या शरीराचे जप्त केलेले अवयव पुरावा म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना तिचे अंत्यसंस्कारदेखील करता आले नाही. "काही महिन्यांत माझ्या मुलीच्या मृत्यूला वर्ष पूर्ण होईल. अंत्यसंस्कार करण्यासाठी मला तिचे अवशेष कधी मिळतील?" असा प्रश्न विकास यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
सोमवारच्या कार्यवाहीचा संदर्भ देताना सीमा कुशवाह म्हणाल्या की, आपल्या मुलीचा आवाज ऐकून झालेल्या भावनिक गोंधळामुळे विकास वालकर हतबल झाले होते. रेकॉर्डिंगमध्ये आपल्या मुलीचा आवाज ऐकून ती अजूनही जिवंत आहे असं त्यांना वाटलं. डीएनए प्रोफाइल मॅचिंगची खात्री होऊपर्यंत त्यांना तिचा मृत्यू झाल्याचं खरं वाटतं नव्हतं. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूनावालावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime