मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मित्राच्या मोबाईलमध्ये होता बहिणीचा फोटो, Delete करण्याच्या वादातून केला खून

मित्राच्या मोबाईलमध्ये होता बहिणीचा फोटो, Delete करण्याच्या वादातून केला खून

मित्राच्या मोबाईलमध्ये (Mobile) आपल्या बहिणीचा फोटो (Sister's photo) असून तो डिलिट (Delete) करत नसल्याच्या कारणावरून खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  desk news

लखनऊ, 5 ऑगस्ट : मित्राच्या मोबाईलमध्ये (Mobile) आपल्या बहिणीचा फोटो (Sister's photo) असून तो डिलिट (Delete) करत नसल्याच्या कारणावरून खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. मित्राला वारंवार सांगूनही तो बहिणीचा फोटो डिलिट करत नसल्याचा मुद्दा विकोपाला गेल्यावर मित्राने आपल्याच मित्रावर धारदार शस्त्राने वार करून त्याला संपवले.

वाद कशामुळे?

उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये रंजन झा आणि सूरज शुक्ला यांची मैत्री होती. एकमेकांच्या घरी त्यांचं येणंजाणं असायचं. रंजनच्या मोबाईलमध्ये सूरजच्या बहिणीचा एक फोटो होता. ही बाब सूरजच्या लक्षात येताच त्यानं त्यावर आक्षेप घेतला. हा फोटो तातडीने डिलिट करण्याची मागणी त्यानं रंजनकडे केली. मात्र रंजनने त्याला नकार दिला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद वाढत गेला. त्यानंतर सूरजने रंजनवर चाकूचे वार केले. त्यात रंजन गंभीर जखमी झाला.

ही घटना समजताच पोलिसांनी धाव घेत रंजनला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रंजनला मृत घोषित केलं. रंजनच्या वडिलांच्या तक्रारीवरून सूरजवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचा -VIDEO: नवी मुंबईत लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत सोन्याने भरलेली बॅग केली लंपास

दोघांचं आयुष्य बरबाद

एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या रंजन आणि सूरज यांचं आयुष्य एक क्षुल्लक कारणावरून बरबाद झाल्याची चर्चा गाझीयाबादमध्ये सुरु आहे. रंजनचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो नोकरी शोधत होता. तर सूरज हा त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. दोघांचाही उमेदीचा काळ सुरु झाला होता. दोघांनाही आपापल्या क्षेत्रात मोठं करिअर करण्याची इच्छा होती. मात्र एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे होत्याचं नव्हतं झालं.

First published:

Tags: Murder, Uttar pardesh