सुमित सोनवणे, प्रतिनिधी
दौंड, 29 नोव्हेंबर : 'एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला)' असं स्टेट्स ठेवून एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारस दौंड तालुक्यातील केडगाव मधील एका 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संकेत प्रकाश लोणकर असं या तरुणाचं नाव आहे.
(2 वर्षाच्या मुलीची मिठीत घेऊन हत्या, मृतदेहासह पित्याने तलावात घेतली उडी; कारण वाचून पाणावतील डोळे)
संकेत लोणकर याने आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे 3 वाजून 32 मिनिटांनी गळफास घेण्याचे प्रतिकात्मक व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन आत्महत्या केली. एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला) असं स्टेट्स संकेतने व्हॉट्सअपवर ठेवलं होतं. सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी स्टेट्स पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. रुमचा दरवाज तोडला असता संकेतचा मृतदेह आढळून आला.
आत्महत्येमागे सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांमधून व्यक्त करण्यात आला आहे. संकेतने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
(एसटी बसने बैलगाडीला उडवलं; आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू)
दरम्यान, बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीच्या आईने आणि भावाने प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रियकराचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बारामतीच्या माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरातून ही घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीची आई व भावाला अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व मयूर संजय चव्हाण वय 22 वर्ष असे या प्रकरणातील आरोपींची नाव आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुनिता चव्हाण व मुलीचा भाऊ मयूर चव्हाण यांना अटक केली आहे. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Pune