गणेश गायकवाड, प्रतिनिधी
उल्हासनगर, 25 मार्च : उल्हासनगरमध्ये सध्या गुन्हेगारी कारवाया वाढत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंबड्यांच्या डिलरशिपवरून गावात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात सागर पाटील गटातील अजीज शेख आणि महेंद्र म्हात्रे हे जखमी झाले असून आरोपी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
जुने अंबरनाथ गावात रहाणारे महेंद्र म्हात्रे आणि सागर पाटील हे कोंबड्यांची डिलरशिप करण्याचा व्यावसाय करतात. तसेच माणेरे गावात राहणारा आकाश भोईर हा देखील कोंबड्यांचा डिलरशिप व्यवसाय करतो. दरम्यान महेंद्र म्हात्रे, सागर पाटील यांनी माणेरे गावात कोंबड्या डिलरशिप केल्याच्या रागातून आकाश भोईर यांच्यात वाद निर्माण झाले होते. याच कारणावरून आकाश भोईर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माणेरे गाव प्रवेशद्वाराजवळ अजीज शेख आणि महेंद्र म्हात्रे यांना अडवून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अजीज शेख याच्या हातावर गंभीर वार झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच सागर पाटील आणि आकाश भोईर या दोघांमधील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचा - धक्कादायक! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर भंडाऱ्यात कुऱ्हाडीने हल्ला
पोलीस तपास सुरू
या हल्ल्यात अजीज शेख याच्या हातावर गंभीर वार झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 326, 323, 504, 506,143,147,148,149 प्रमाणे आरोपी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत फिर्यादी महेंद्र म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, '24 मार्चला सकाळी 7.10 वाजेच्या सुमारास मी आणि माझा मित्र सागर पाटील कोंबड्या पोहचविण्याचं काम अंबरनाथ पुर्व भागात करीत होतो. त्यावेळी मला सागर भोईर याचा फोन आला की तू लवकर ये. मग मी आणि मित्र अजिज दस्तगीर शेख मोटार सायकलवर तसेच सागर पाटील व कुंदन मडवी हे एका मोटार सायकलवर असे आम्ही सागर भोईरला भेटण्यासाठी गेलो. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मोणेरेगाव उल्हासनगर नं. 4, काजल किराणा स्टोअर्स समोर रोडवरून जात असताना सागर पाटील व कुंदन मडवी हे माझ्या पुढे निघून गेले. तेव्हाच तिथे हातात तलवारी, लोंखडी रॉड लाकडी दांडके घेवून उभे राहीलेले आरोपी आकाश भोईर, आशिश उर्फ बंटी भोईर, सुशिल भोईर, बादल वर्मा कल्पेश आणि इतर 3 ते 4 जणांनी माझी मोटार सायकल थांबून "तुम्ही इकडे का आले" असं बोलून मला व अजित शेख या शिवीगाळ दमदाटी करून मोटार सायकलवर जोर-जोरात त्यांचेकडील हत्याराने मारहाण केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Ulhasnagar