Home /News /crime /

प्रेयसीचा बदला घेण्यासाठी तरुण झाला सीरियल किलर; 3 महिलांची हत्या अन् 5 जणींची प्लानिंग

प्रेयसीचा बदला घेण्यासाठी तरुण झाला सीरियल किलर; 3 महिलांची हत्या अन् 5 जणींची प्लानिंग

प्रेयसीसाठी तरुणाला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : आपल्या प्रेयसीचा बदला करण्यासाठी तो सीरियल किलर झाला आणि 8 महिलांची हत्या करण्याचं कारस्थान रचलं. आतापर्यंत त्याने 3 महिलांची हत्या केली. त्या महिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन विविध ठिकाणी ठेवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या महिलेला मारण्याची तयारी करण्यापूर्वी त्याला पकडण्यात आलं. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला असून त्याने सांगितलं की, या महिलांनी आपल्या प्रेयसील देहविक्रय व्यवसायात ढकलल्यासाठी जबाबदारी होत्या. कर्नाटकात महिलांची हत्या करणाऱ्या सीरियल किलर रामनगर जिल्ह्यातील कुदूर येथे राहतो. त्याचं नाव टी सिद्दलिंगप्पा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला नावाच्या एक महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. या हत्या प्रकरणात तिलाही त्याब्यात घेण्यात आलं आहे. तीन हत्या आणि 5 प्लानिंग... या वर्षाच्या सुरुवातील बंगळुरू आणि मैसूरमध्ये 3 महिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने आणखी 5 महिलांची हत्या करण्याचा प्लान आखला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जेव्हा पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली, त्यावेळी तो आणखी एका महिलेच्या हत्येची तयारी करीत होता. गटारात शिर कापलेलं धड सापडलं... गटारात एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यापासून काही अंतरावर आणखी एक मृतदेह सापडला होता. दोन्ही मृतदेह साधारण 25 किमीअंतरावर होते. मात्र दोन्ही मृतदेहांचे केवळ धड सापडले होते. आरोपीची कबुली... चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, काही वर्षांपूर्वी सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या चंद्रकलासोबत तो संबंधात आला होता. यादरम्या तरुणीने आपली आपबीती त्याला सांगितली. यामुळे आरोपीने प्रेयसीला या व्यवसायात ढकणाऱ्यांचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने तब्बल तीन महिलांची हत्या केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Karnataka, Murder

    पुढील बातम्या