शिवा बनून हिंदू तरुणीशी थाटला संसार; 5 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार आला समोर

शिवा बनून हिंदू तरुणीशी थाटला संसार; 5 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार आला समोर

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचे दोन भाऊ व वडिलांनाही अटक केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : रोहिणीतील प्रेम नगर भागात एका मुस्लीम तरुणाने शिवा बनून हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि त्यानंतर तिच्याशी लग्नही केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाचं खरं रुप समोर आल्यानंतर तरुणीने याचा विरोध केला. यामुळे तरुणाच्या नातेवाईकांनी तरुणीला अनेक दिवस बंधक बनवून ठेवलं. इतकचं नाही तर तिला मारहाणही केली. आरोपीच्या भावानेही तरुणीसोबत छेडछाड केली. त्रस्त तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर फसवणूक, दुष्कृत्यसह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचे दोन भाऊ अफजल आणि अरसद याशिवाय त्याचे वडील मोहम्मद इदरीस यांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अख्तर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.  23 वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासह प्रेम नगर भागात राहते. 5 वर्षांपूर्वी ती आपल्या नातेवाईकांच्या घरातील धार्मिक कार्यक्रमात गेली होती. या कार्यक्रमात आरोपीसोबत तिची भेट झाली. त्याने स्वत:चं नाव शिवा असल्याचं सांगितलं. याशिवाय तो एका संपन्न हिंदू कुटुंबातील असल्याचेही सांगितले. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे आणि तो कुटुंबासोबत किराडी येथे राहतो. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. आरोपी अख्तर गेल्या 5 वर्षांपासून पीडितेसोबत होता आणि अनेकवेळा त्यांनी जवळीकही केली होती. यानंतर जेव्हा पीडितेने लग्न करण्याबाबत विचारणा केली त्यानंतर आरोपीने या वर्षी 14 ऑगस्ट रोजी आर्य समाज वाहनवासी ट्रस्ट मंदिरात हिंदू धर्मानुसार लग्न केलं.

लग्नानंतरही आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला नाही. त्याने पीडितेला सांगितलं की, हुंडा म्हणून त्यांनी प्लॉट, गाडी आणि पैसे द्यावे. त्यानंतर तो तिला घरी घेऊन जाईल. वारंवार सांगूनही जेव्हा आरोपी तिला आपल्या घरी घेऊन जात नव्हता, हे पाहून ती स्वत: त्याच्या घरी पोहोचली. तेथे गेल्यावर तिला कळालं की शिवाचं खरं नाव अख्तर आहे आणि ती मुस्लीम आहे. खरं समोर आल्यानंतर ती हादरली. पीडितेना पोलिसांना सांगितलं की, अफजल आणि अरसद यांनी तिच्यासोबत छेडछाड केली. यामुळे त्रस्त होऊन ती आपल्या घरी जायला लागली, परंतु आरोपीने तिला घरात ओलिस ठेवले. 8 डिसेंबर रोजी आरोपींनी पीडितेला मारहाण केली. व्यथित झालेल्या पीडितेने शेजारांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. आरोपीने या युवतीशी लग्न करण्यासाठी नाव बदलले होते.

पोलीस उपायुक्त पीके मिश्रा यांनी सांगितलं की, तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 13, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या