मनमाड, 30 नोव्हेंबर : व्यसन अनेक प्रकारचे असतात काहीना दारूचा..काहीना अंमली पदार्थाचा, तर काही जणांना मोबाईलमध्ये गेम (Mobile games)खेळण्याचे असते. गेम खेळण्याच्या नादापायी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या तर काहीनी मोबाइलसाठी घरात चोरी देखील केली आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगावमध्ये ऑनलाइन फ्री फायरगेम (free fire game) खेळण्यासाठी मोबाईल हरवला म्हणून गावात एका निरपराध तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी भौरी येथील जिभाऊ गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या खून झाला होता. त्याचा तपास करतांना पोलिसांनी याच गावातील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या तरुणाची चौकसी केली असता आपणच मोबाईलसाठी जिभाऊच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची, त्याने कबुली जबाब दिला आहे. सुनील मोरे असं या आरोपीचे नाव असून त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अवघ्या 48 तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून गजाआड केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
1 जानेवारीपासून UPI पेमेंट यंत्रणेत होणार मोठा बदल; Paytm वर काय होणार परिणाम?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव पासूनजवळ असलेल्या भौरी येथील जिभाऊ हा तरूण शेतात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचे वडील मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर वेगाने तपासाची सुत्रे हलविली होती. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी जिभाऊ यांच्यासोबत सुनील मोरे (वय 19) हा फिरत होता, अशी गुप्त माहिती पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सुनील मोरे याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. सुरवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच आपणच जिभाऊ याचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
तरुणाच्या हत्येसाठी ऑर्डर केले 25 चाकू; अॅमेझॉन-फ्लिपकार्टला पोलिसांचं निवेदन
संतोषला फ्री-फायर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते आणि नेमका त्याचा मोबाइल हरवला होता. त्यामुळे तो सैरभैर झाला होता. जिभाऊ हा त्याला जाताना दिसला आणि अंधाराचा फायदा घेत त्याच्या डोक्यावर दगडाने ठार केल्यानंतर त्याच्या खिशातील पैसे काढले आणि त्यातून नवीन मोबाइल घेवून पुन्हा गेम खेळण्यात गुंतला होता. मात्र, त्याचा हा गेम अंतिम ठरला आणि त्याला तुरुंगात जाण्याची वेळ आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.