मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

परदेशातील नवरीसाठी तरुणाच्या 6 लाखांना चुना; आता दररोज मारतोय पोलीस स्टेशनच्या फेऱ्या

परदेशातील नवरीसाठी तरुणाच्या 6 लाखांना चुना; आता दररोज मारतोय पोलीस स्टेशनच्या फेऱ्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लग्नासारखे निर्णय डोळे बंद करून नाही तर सजगपणे घ्यायला हवेत.

  • Published by:  Meenal Gangurde

फरीदाबाद, 29 नोव्हेंबर : मॅट्रीमोनियल साईटवर ( matrimonial site) लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाची तब्बल 5 लाख 78 हजारांची फसवणूक झाली आहे. यानंतर गुन्हे विभागाने कारवाई करीत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अधिक सजग राहणं आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या चार सदस्यांची नावं चिनोतो रॉय अकाता, अजय, आतिफ अली व एका महिला आरोपीचा समावेश आहे. आरोपी चिनोंतो रॉय अकाता नायजेरियन आहे. सर्व आरोपी दिल्लीत राहत होते. आरोपींनी मॅट्रिमोनियल साइटवर लग्नाचं आमिष दाखवून फरीदाबाद येथील एक निवासी अमरीक याचा 5 लाखांना चुना लावला. पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, मॅट्रिमोनियल साइटवर त्याची भेट एक तरुणीसोबत झाली होती. तिने तरुणाला खोटी माहिती देत आपण नेदरलँड देशातील अॅमस्टडँम शहरातील असल्याचं सांगून च्याच्याशी मैत्री केली व प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

हे ही वाचा-Insurance चे पैसे हडपण्यासाठी पतीने केला पत्नीचा खून, फिल्मी स्टाईल डाव झाला उघड

आरोपीने तरुणीने भारतात त्याला भेटायला येणार असल्याचं सांगितलं. काही वेळानंतर आरोपी तरुणीने अमरीकला फोन करून सांगितलं की, ती तब्बल 88 लाखांचं सामान घेऊन येत होती, आणि एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी तिला पकडलं आहे. यानंतर अमरीकची आरोपींपैकी एका सदस्यासह कस्टम अधिकारी म्हणून बोलणं करवून दिलं. कस्टर अधिकाऱ्यांना कागदोपत्री कामासाठी 5 लाख 78 हजाप रुपये भरावे लागणार असल्याचं सांगितलं. यावेळी इतके पैसे नसल्याचे तरुणीने अमरीकला सांगितलं आणि मदतीचे मागणी केली. अमरीक मुलीच्या जाळ्यात अडकला व तिच्या बनावटी खात्यात पैसे ट्रान्सफर केले.

जेव्हा अमरीक ही फसवणूक असल्याचं कळालं तर त्याने सायबर क्राइम (Cyber Crime) विभागात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी एका टीमचं गठण करून आरोपींचा शोध सुरू केला. अखेर या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या बँक खात्यातून गेल्या 6 महिन्यात तब्बल 60 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं दिसून आलं. आरोपींनी गाजियाबाद, नोएजा, अहमदाबाद, गुरुग्राम येथील काही भागांमध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे.

First published:

Tags: Marriage