Home /News /crime /

कोल्हापुरात आढळला महिलांचा जुगार अड्डा, पोलिसांनी लावला डोक्याला हात

कोल्हापुरात आढळला महिलांचा जुगार अड्डा, पोलिसांनी लावला डोक्याला हात

जयसिंगपूर भागात एका घरात तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    कोल्हापूर, 06 डिसेंबर : कोल्हापुरात कधी काय घडेल याचा नेम नाही. कोल्हापुरात पोलिसांनी एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत सात महिलांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, या महिला सर्व रेकॉर्डवर गुन्हेगार आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी इचलकंरजी आणि जयसिंगपूर परिसरात पोलिसांनी जुगार अड्यावर छापा टाकला होता. यावेळी सात महिला जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यात एका पुरुषालाही अटक करण्यात आली आहे.  जयसिंगपूर भागात एका घरात तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सात महिलांना अटक करण्यात आली. या सातही महिलांवर खिशे कापणे, चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहे. या कारवाईमध्ये 38 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवशीच महिला PSI ची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या मीना काळे, छाया लोंढे, हेमा कसबेकर, वर्षा लोंढे, बेबी शेख आणि ज्योती पाटील अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावं आहे. या सर्व महिला सराईत चोरट्या असून त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी या सातही महिलांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. याआधीही चार महिन्यांपूर्वी जुगार अड्यावर केलेल्या कारवाईत महिलांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आली. डोक्यात दगड घालून तरुणाची निर्दयी हत्या दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये एका 40 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समतानगर येथील रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात घडली. गोविंद मुक्तीकोळ (वय 40)  असं मृत व्यक्तीचं नाव असून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून हत्या केली.  रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. गोविंद हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. पत्नीने पाहिली क्राइम पेट्रोल मालिका,पतीच्या हत्येचा कट ऐकून पोलीसही झाले हैराण गोविंदची हत्या समतानगर येथील जुन्या हरिपूर रस्त्यावर झाली असून दोन ते तीन हल्लेखोरांनी ही हत्या केली केली असल्याचा संशय आहे.  गोंविद आणि त्याच्या इतर अंमली पदार्थ व्यसनी मित्रांत वाद होऊन ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Kolhapur, कोल्हापूर

    पुढील बातम्या