मुलांच्या भांडणातून तिघींनी मिळून केली महिलेला मारहाण, जागेवरच सोडले तिने प्राण

मुलांच्या भांडणातून तिघींनी मिळून केली महिलेला मारहाण, जागेवरच सोडले तिने प्राण

पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली-बाग येथे लहान मुलं खेळत होती. खेळता खेळता मुलांमध्ये भांडणं झाली.

  • Share this:

मालेगाव, 18 ऑक्टोबर : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून  किरकोळ कारणावरून गुंडांनी गावठी पिस्तुलमधून गोळीबार करून  2 जणांना जखमी केले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर दुसऱ्या घटनेत लहान मुलांच्या भांडणातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे.

पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली-बाग येथे लहान मुलं खेळत होती. खेळता खेळता मुलांमध्ये भांडणं झाली. मुलांनी भांडणाची तक्रार आपल्या आईंकडे केली. त्यामुळे जाब विचारण्यासाठी आरोपी महिलांनी मृत आमना मलिक यांचे घर गाठले. त्यानंतर या महिलांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. तिन्ही महिलांनी मिळून आमना मलिक यांना जबर मारहाण केली. जबर मारहाणीमुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.

धुळे हादरलं, बेपत्ता असलेल्या 2 वर्षांच्या प्राचीचा विहिरीत आढळला मृतदेह

गोळीबाराची घटना शहरातील पवारवाडी भागात घडली आहे. मागील भांडणाची कुरापत काढून मुदस्सीर नावाच्या तरुणाने चहाच्या टपरीवर बसलेल्या चार मित्रांवर गावठी पिस्तुलमधून गोळ्या झाडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीती पसरून पळापळ झाली. गोळीबारात शेख इब्राहिम आणि गुफरान शेख हे दोघे जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी उप अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक शकिल शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

एकीकडे नव्याने रुजू झालेले ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख मालेगावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी समितीची बैठक घेत असताना दुसरीकडे शहरातील वेगवेगळ्या भागात या दोन्ही घटना घडल्या आहे.

बेदम मारहाणीत चोराने सोडले प्राण, गोदाम मालकासह कामगारांवर खूनाचा गुन्हा दाखल

पंधरा दिवसांपूर्वीच अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांची बदली झाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पदभार स्वीकारला असून शहर उपविभागीय पोलीस अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार मंगेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे वाढत चालेल्या गुन्हेगारीच्या घटनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 18, 2020, 6:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading