मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यातील महिलेला 12 लाखांचा गंडा घालणारी व्यक्ती काँगो देशातील, अखेर अटक!

पुण्यातील महिलेला 12 लाखांचा गंडा घालणारी व्यक्ती काँगो देशातील, अखेर अटक!

एका ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग पोर्टलवरून फेक प्रोफाईल बनवत, या महिलेला 12.3 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी तिने पुण्यात तक्रार दाखल केली होती.

एका ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग पोर्टलवरून फेक प्रोफाईल बनवत, या महिलेला 12.3 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी तिने पुण्यात तक्रार दाखल केली होती.

एका ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग पोर्टलवरून फेक प्रोफाईल बनवत, या महिलेला 12.3 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी तिने पुण्यात तक्रार दाखल केली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : 2021च्या जानेवारी महिन्यात पुण्यातील एक महिला ऑनलाईन फसवणुकीला (Pune Online fraud) बळी पडली होती. एका ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग पोर्टलवरून फेक प्रोफाईल बनवत, या महिलेला 12.3 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी तिने पुण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता दीड वर्षांनी या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक (Congolese woman arrested) करण्यात आले आहे.

बियू न्यामाएंबेलो ऑक्टाव्हिए असं या 28 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती काँगो देशाची रहिवासी आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस (LOC notice) जारी केली होती. त्यानुसार ती दिल्लीमध्ये विमानतळावर (Congolese woman arrested in Delhi) उतरताच तिला अटक स्थानिक प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले होते. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काय आहे प्रकरण?

जानेवारी 2021 मध्ये एका 40 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक (Pune woman cheated online) करण्यात आली होती. डेटिंग आणि मॅचमेकिंग वेबसाईटवर एका अमेरिकन कॉस्मेटिक सर्जनच्या नावाने फेक अकाउंट सुरू करण्यात आलं होतं. हा सर्जन घटस्फोटित दाखवण्यात आला होता. व्हिडिओ कॉल आणि अमेरिकेतील काही हॉस्पिटलचे कथित व्हिडिओ दाखवून या महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला होता. त्यानंतर या सर्जनने तक्रारदार महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. यानंतर काही दिवसांनी आपल्या आईच्या डोक्याला मार लागल्याचं सर्जनने या महिलेला सांगितले. तिच्या उपचारांसाठी बेंगळुरूमधील एका संस्थेकडून औषधी बियाणं खरेदी करण्यासाठी मनी-ट्रान्सफर करण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली. या वेळी या महिलेने काही पैसे पाठवले.

पुणे : लग्नाच्या 2 वर्षांनंतर दुसऱ्या लग्नाची तयारी; शेवटी पत्नीने भयंकर पद्धतीने मार्ग केला मोकळा

यानंतर या बियाण्यांच्या उपचारांनी फरक पडल्याचे सांगत, आपण त्याचा व्यवसाय सुरू करू असं या सर्जनने महिलेला सांगितले. त्यासाठी त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. याही वेळी महिलेने पैसे पाठवले. त्यानंतर या सर्जनला भारतात आल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, त्याला सोडवण्यासाठी आणखी पैशांची गरज असल्याचे सांगत या महिलेकडून आणखी पैसे उकळण्यात आले. जोपर्यंत तक्रारदार महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजले, तोपर्यंत तिच्याकडून 12.3 लाख रुपये उकळण्यात आले होते. यानंतर या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता.

असा केला तपास

महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सहाय्यक निरीक्षक ए.एम. पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. विविध मार्गांनी तपास केल्यानंतर असं समोर आलं, की हे रॅकेट बेंगळुरूमधून कार्यरत होतं. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात एक तपास पथक बेंगळुरूला जाऊन आलं. तेव्हा ऑक्टेव्हिए (Biyu Nyamaembelo Octavie) नावाची एक काँगो देशातील महिला आधीच देश सोडून गेली होती. तिचा पुरूष सहकारी बेंगळुरूमध्येच होता, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. बेंगळुरूमधील त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि मोबाईल फोन असं साहित्य मिळालं. या वस्तू तपासल्यानंतर हे स्पष्ट झालं की हे दोघेही भारतात विद्यार्थी व्हिसा घेऊन आले होते, आणि खोट्या नावाने राहत होते. तसेच, हे अशा प्रकारची ऑनलाईन फसवणूक करत होते, हेदेखील स्पष्ट झालं. डीसीपी आनंद भोईटे यांनी याबाबत माहिती दिली.

ज्याची भाकरी खाल्ली, त्याचेच घर फोडले, 43 लाखांचे सोनं घेऊन बिहारी तरुण पळाला, पण...

अखेर या महिन्यात अटक

या महिलेविरोधात नंतर पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. 19 ऑगस्टला ती दिल्ली विमानतळावर उतरताच स्थानिक अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिला अटक केली. ती सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या सहकाऱ्याचा शोध सुरू आहे. तसंच, या महिलेने अशा प्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.

First published:

Tags: Crime news, Money fraud, Pune