मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अंधाऱ्या रात्री ट्रॉली बॅगेत प्रियकराचा मृतदेह अन् शेजारी पोलीस वॅन; महिलेचा क्रूर चेहरा उघड

अंधाऱ्या रात्री ट्रॉली बॅगेत प्रियकराचा मृतदेह अन् शेजारी पोलीस वॅन; महिलेचा क्रूर चेहरा उघड

अंधाऱ्या रात्रीतून एक महिला ट्रॉली बॅग खेचत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांनी...

अंधाऱ्या रात्रीतून एक महिला ट्रॉली बॅग खेचत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांनी...

अंधाऱ्या रात्रीतून एक महिला ट्रॉली बॅग खेचत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यांनी...

    पाटना, 8 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील एका महिलेने आपल्या लिव्ह-इन-पार्टनरची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. इतकच नाही तर त्याने प्रियकराचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये घातला. ती मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या तयारीत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. लग्न लवकर करण्यासंबंधात दोघांमध्ये भांडण झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारच्या मध्यरात्री पोलीस गश्तीवर होते. यादरम्यान एक महिला भलीमोठी ट्रॉली बॅग खेचताना दिसली. पोलिसांची गाडी पाहून महिला घाबरली आणि रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न करू लागली. पोलिसांना महिलेचा संशय आला. त्यांनी बॅग चेक केली तर तेदेखील हैराण झाले. कारण बॅगेत एका तरुणाचा मृतदेह कोंबला होता. चौकशीदरम्यान महिलेने तिचं नाव प्रीती शर्मा असल्याचं सांगितलं. हा मृतदेह तिचा लिव्ह इन पार्टनर इकबालचा होता. तो दिल्लीत न्हाव्याचं काम करीत होता. महिला आपला पती दीपक यादव याला सोडून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून फिरोजसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. दोन दिवसांपूर्वी लग्नावरुन दोघांमध्ये वाद झाला. यावर फिरोज महिलेला म्हणाला की, तू चांगली नाहीस. जी स्त्री आपल्या पतीची होऊ शकली नाही ती माझी काय होईल. यामुळे संतापलेल्या प्रीतीने घरात ठेवलेल्या उस्तऱ्याने फिरोजचा गळा चिरला. आरोपी महिलेने सांगितलं की, रविवारी दुपारी तिने दिल्लीतून एक ट्रॉली बॅग विकत घेतली. रात्री फिरोजचा मृतदेह ट्रॉली बॅगेत ठेवला आणि गाजियाबाद रेल्वे स्टेशनवर कोणत्या तरी ट्रेनमध्ये ठेवण्याचा प्लान होता. मात्र यादरम्यान पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Uttar pradesh news

    पुढील बातम्या