मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एका टॅटूमुळे झाला हत्येचा उलगडा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा मर्डर

एका टॅटूमुळे झाला हत्येचा उलगडा; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा मर्डर

मृतदेहाजवळ कोणताच पुरावा नव्हता. केवळ त्याच्या एका हातान टॅटू होतं, त्यातून हत्येचा उलगडा झाला.

मृतदेहाजवळ कोणताच पुरावा नव्हता. केवळ त्याच्या एका हातान टॅटू होतं, त्यातून हत्येचा उलगडा झाला.

मृतदेहाजवळ कोणताच पुरावा नव्हता. केवळ त्याच्या एका हातान टॅटू होतं, त्यातून हत्येचा उलगडा झाला.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) टॅटूच्या मदतीने एक हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली पत्नीसह सात जणांना अटक केली आहे. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीतील एका नाल्याजवळील काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेमध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी यानंतर घटनास्थळी धाव घेतली. या बॅगेत 35 ते 37 वर्षाच्या एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेह सडल्यामुळे त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं. मृत शरीराच्या डाव्या हातावर नवीन असं लिहिलं होतं. याशिवाय त्याच्या एका हातात स्टिलचा कडादेखील होती. चौकशीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, त्याची हत्या दुसऱ्याच ठिकाणी करण्यात आली होती. (A tattoo reveals a murder Husband murdered by wife with the help of boyfriend)

केवळ टॅटूच्या माध्यमातून पोलिसांनी मृत तरुणाचा शोध सुरू केला. 12 ऑगस्ट रोजी त्याची पत्नी मुस्कानने तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नवीन 8 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. पोलीस जेव्हा मृत तरुणाच्या पत्नीच्या गावी चौकशीसाठी गेले तेव्हा ती तिथं नव्हती. त्यावेळी समोर आलं की ती काही दिवसांपूर्वी भाड्याचं घर रिकामं करून निघून गेली आहे.

हे ही वाचा-पॉर्न पाहण्यासाठी उडवले तब्बल 1 कोटी; कर्मचाऱ्याने कंपनीच्या कार्डावर केली मौज

शेजारच्यांनी चौकशी केल्यानंतर नवीनची पत्नी मुस्कानबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. ती आपली आई व दोन वर्षांच्या मुलीसोबत तेथे राहत होती. एक चश्मा लावणारी व्यक्ती वारंवार तिच्या घरी येत असल्याचंही शेजारच्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मुस्कानचा नंबर मिळवला व तिचा शोध घेतला. शेवटी ती खानपूर गावात असल्याचं समोर आलं. पोलिसांनी नवीन बद्दल विचारलं आणि पुराव्यासाठी त्याच्या हातावर टॅटू असल्याचंही सांगितलं. मात्र मुस्कारने यास नकार दिला. मात्र यावेळी नवीनच्या नावाने मात्र या टॅटूची पुष्टी केली. सुरुवातील मुस्कानने पोलिसांना खोट सांगितलं. मात्र शेवटी पोलिसांचा इंगा दाखविल्यावर तिने त्या दिवशी घडलेला प्रकार सांगितला.

काय झालं होतं त्या दिवशी?

गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मुस्कान नवीनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांना दोन वर्षांची मुलगीदेखील आहे. मात्र मुस्कान हिचं जमाल नावाच्या तरुणासोबत संबंध होतं. त्या दिवशी जेव्हा नवीन घरी आला तेव्हा जमाल घरी होता. त्याला पाहून नवीन संतापला. दोघांमध्ये वाद झाला. याशिवाय जमालचे काही मित्र घराबाहेर उभे होते. घरात आवाज ऐकून ते सर्वजण आत आले व त्यांनी नवीनच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून त्याची हत्या केली. यानंतर त्याने बाथरूनमध्ये नेत नवीनचा मृतदेह धुतला आणि सकाळी एका मित्रांच्या मदतीने एका ट्रॉली बॅगमध्ये भरला. त्यानंतर ही ट्रॉली बँग नाल्यात फेकून आला. या घटनेनंतर मुस्कान, जमालसह त्याच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

First published:

Tags: Gang murder, Murder, Wife and husband